कृषी विभाग
शेतकरी संघटनेच्या…या नेत्याची पेढेतुला !
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
गेल्या एकशे सहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या नऊ गावांच्या आकारपडीत जमिनीचा प्रश्न प्रलंबीत होता.शतकाहून अधिक कालखंड उलटून व अनेक पिढ्या संपूनही हा प्रश्न अजून मार्गी लागलेला नसताना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने सदर जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा ऐत्याहासिक निर्णय दिल्याने शेतकऱ्यांनी अकाली दिवाळी साजरी केली असून या संबंधी मोफत याचिका चालवून शेतकऱ्यांना न्याय देणारे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांची नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील ब्राम्हणगाव वेताळ या ठिकाणी मोठी मिरवणूक काढून त्यांची पेढे तुला केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तत्कालीन इंग्रज सरकारने मुंबई सरकारच्या गॅझेट दि.०१ ऑगष्ट १९१८ अनव्ये १९१८ कलम-१ अनव्ये मुंबई सरकारचे सचिव ए.एफ.एल.बरणे यांनी तत्कालीन गव्हर्नरच्या आदेशाने वडाळा महादेव,मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खानापूर,ब्राम्हणगाव वेताळ,शिरसगाव,उंदीरगाव,निमगाव,खैरी आदी ०९ गावांची जमीन गॅझेट क्रं.७८८४ दि.०१ ऑगष्ट १९१८ अन्वये जमीन सुधारणा करून शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्याच्या उद्देशाने विना मोबदला भूसंपादन केली होती व ती पुढे भंडारदरा धरण झाल्यावर बेलापूर सिंडिकेट कंपनीस सन-१९२० च्या करारानुसार सुपूर्त केली होती.मात्र सदर कंपनी अवसायनात गेल्याने ती ०७ हजार एकर जमीन बेलापूर कंपनीस वर्ग केली होती.ती पुढे सरकारने सदर शेतकऱ्यांना परत केलीच नाही.त्याबाबत अनेक दशके शेतकऱ्यांनी लढा दिला होता.मात्र त्यास यश येत नव्हते.अखेर वैतागून शेतकऱ्यांनी याबाबत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.
सदर याचिका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी विनामूल्य चालवली होती.त्यातून नुकताच निकाल हाती आला होता.या संबंधी उच्च न्यायालयाचे न्या.रवींद्र घुगे,न्या.वाय जी.आदींनी या प्रकरणी आपला निकाल दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करून सदर जमिनी वडाळा महादेव,मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खानापूर,ब्राम्हणगाव वेताळ,शिरसगाव,उंदीरगाव,निमगाव,खैरी आदी नऊ गावातील शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा ऐत्याहसिक निर्णय दिला होता.दरम्यान या नऊ गावातील शेतकऱ्यांनी मोठा आनंद सोहळा साजरा केला होता.एवढ्यावर ही मंडळी थांबली नाही.मुठे वाडगाव,माळ वाडगाव,खैरी निमगाव,वडाळा आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी ऍड.काळे यांची सवाद्य मिरवणूक काढून आपली कृतज्ञता व्यक्त केली होती.त्यावेळी डी.जे.च्या गजरात व जे.सी.बी.च्या साहाय्याने गुलाल व गुलाबपुष्प उधळत हा जल्लोष साजरा केला आहे.
आजही ब्राम्हणगाव वेताळ येथील शेतकऱ्यांनी त्यांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आहे.त्यांनी आपल्या गावात ऍड.काळे यांची सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ब्राम्हणगाव फाटा शेती महामंडळाचे कार्यालयापासून ही मिरवणूक सुरू करून म्हसोबा महाराज मंदिराजवळ सदर मिरवणुकीची सांगता झाली असून त्या ठिकाणी त्यांची पेढेतुला केली आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,ऍड.साक्षी काळे,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप,युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.रोहित कुलकर्णी,नेवासा तालुकाध्यक्ष अशोक काळे,प्रभाकर कांबळे,शरद आसने,गोविंद वाघ,संजय वमने,बाळासाहेब बकाल,सुरेश ताके,भरत आसने,सोपान नाईक,बबन नाईक,बाळासाहेब आसने,सुनील आसने,अनिल आसने,सचिन वेताळ बाबासाहेब साईराम वेताळ गंगाधर वेताळ बबनराव वेताळ गोरक्षनाथ वेताळ जितेंद्र चांदगुडे उत्तम पानसरे रघुनाथ वेताळ दत्तात्रय मोहन वेताळ गोरख बाळकृष्ण वेताळ राहुल निघीट बाबासाहेब निघूट विलास शिंनगार,नेवासा प्रसिध्दी प्रमुख नरेंद्र काळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.