कोपरगाव तालुका
निखिल काळे सि.ए.परीक्षा उत्तीर्ण

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नुकत्याच संपन्न झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आय.सी.ए.आय.) घेतलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून त्यात कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे यांचे सुपुत्र निखिल काळे यांनी सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सी.ए.निकालाचे प्रमाण फारच अल्प असते.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थीच निकालाबाबत साशंक असतो.तरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा गोष्टी सकारात्मकदृष्टय़ा पाहिल्या व अभ्यासाच्या नजरेतून काय उपयोगी आहे याचा विचार केल्यास या मुलांना नक्कीच यश मिळते-निखिल काळे,यशस्वी विद्यार्थी,माहेगाव देशमुख.
सी.ए. ची परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते.त्यामुळे या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी आहे.या परीक्षेचा निकाल जेमतेम दहा टक्यांच्या आसपास लागत असतो.हि परिक्षा उत्तीर्ण होणे म्हणूच अवघड मानले जाते.मात्र हि परीक्षा नुकतेच माहेगाव देशमुख येथील रहिवाशी व कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे यांचे चिरंजीव निखिल काळे हे उत्तीर्ण झाले आहे.
त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,सभापती पूर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,प्रगतशील शेतकरी सुंदरराव काळे आदींनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.