संपादकीय
“यथा प्रजा,तथा राजा”

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडी-अडचणी समजून घेवून संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे सोमवार दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा- २०२७ साठी मंजूर ३० हजार कोटी रुपयांचा निधी उत्तरेतील नेत्यांनी आपल्या संस्थानाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे.मुंबई,नाशिक,गुजरातकडून येणाऱ्या शिर्डी पालखी मार्गाला संबंधितांनी वाटण्याच्या अक्षदा दाखवल्या आहेत.तीच बाब शिर्डीच्या साईबाबांच्या उत्सव काळात गर्दीच्या काळात संकटमोचक ठरलेल्या जवळके,तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची झाली आहे.या मार्गावर नागरिक आणि प्रवासी केवळ मरण्यासाठीच सोडून दिल्याचे जाणवत आहे. हे रस्ते सिंहास्थ कुंभमेळ्यात का घेतले नाही याची माहिती देण्याचे धाडस सत्ताधारी दोन्ही गटाचे नेते दाखवतील का ?
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोपरगाव तहसीलमध्ये आपले काम करून घेताना दलालांचा मोठा सुळसुळाट झाला असून अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याखेरीज नागरिकांचे एकही काम होत नसल्याचा आरोप भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा.स्व.सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला होता.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी गटात खळबळ उडाली होती.त्याबाबत सत्ताधारी गटाचे सकारात्मक (! ) पावले पडताना दिसत आहे.नुसता महसूल विभागच नाही तर पोलिस, जलसंपदा,भूमिअभिलेख,महावितरण, सार्वजनिक बांधकाम,पंचायत समिती आदि विभाग साव आहे असे नाही.दस्त नोंदणी विभागात चांगले अधिकारी बदलून आल्याने या विभागात तरी वर्तमानात कोणाच्या तक्रारी असल्याचे दिसत नाही.वरील वादग्रस्त विभागांवर कोणाचे नियंत्रण आहे का ? असा सवाल निर्माण व्हावा अशी मतदार संघाची स्थिती आहे.
उत्तर नगर जिल्ह्यातील आणि कोपरगाव तालुक्यातील नेते केवळ स्वतःला हिरण्यकश्यपू सारखे भगवान घोषित करायचे बाकी राहिले आहे.वर्तमानात गणेशोत्सव सुरू आहे. त्याठिकाणी भगवान श्री गणेशासमोर यांच्या १५-२० फुटाच्या प्रतिमा पाहिल्या की याची साक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही.बिचारे गणपती बाप्पा त्यांच्या पुढे फारचं खुजे वाटतात.बिचारे गणपती बाप्पा!
पुणतांबा चौफुलीवर नुकत्याच केलेल्या रस्त्याची काम झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात भक्तनिवासाच्या बाजूने होत्याचे नव्हते झाल्यासारखी झाली आहे.सिंहस्थ कुंभमेळा- २०२७ साठी मंजूर ३० हजार कोटी रुपयांचा निधी उत्तरेतील नेत्यांनी आपल्या संस्थानाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे.मुंबई,नाशिक,गुजरातकडून येणाऱ्या शिर्डी पालखी मार्गाला संबंधितांनी वाटण्याच्या अक्षदा दाखवल्या आहेत.तीच बाब शिर्डीच्या साईबाबांच्या उत्सव काळात गर्दीच्या काळात संकटमोचक ठरलेल्या जवळके,तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची झाली आहे.या मार्गावर नागरिक आणि प्रवासी केवळ मरण्यासाठीच सोडून दिल्याचे जाणवत आहे. हे रस्ते सिंहास्थ कुंभमेळ्यात का घेतले नाही याची माहिती देण्याचे धाडस सत्ताधारी दोन्ही गटाचे नेते दाखवतील का ? एरव्ही नदीला पाणी आमच्या मुळे सुटले, कालवे आमच्यामुळे सुटले,कालवा आवर्तन आमच्यामुळे सुटले, रस्ते आमच्यामुळे झाले,विकासकामे आमच्यामुळे झाले म्हणण्याची अहमहनिका पहावयास मिळते.(मतदार संघाचे नशीब पाऊस आमच्या मुळे झाला,नदी,नाले आमच्यामुळे वाहतात असे म्हणत नाही) मात्र शहर आणि मतदार संघातील रस्ते आमच्या टक्क्यामुळे निकृष्ट होतात.पिण्याचा पाणीपुरवठा आजही शुद्ध होत नाही.वितरण व्यवस्था गेली ०८ वर्षात दुरुस्त होऊ शकली नाही.ज्या महावितरण कंपनीची बैठक आयोजीत केली त्या शहा पंचाळे येथील महावितरण कंपनीचे २२० के. व्ही.ए. चे सबस्टेशन अद्याप पूर्ण झालेले नाही.सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊन वर्षे उलटत आले आहे.परिणाम स्वरूप अद्यापही खरिप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज मिळत नाही.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना -२ हिचे कागदपत्र करण्यास महसूल विभागाला दिड पावणेदोन वर्षे वेळ भेटत नाही. शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचे शुक्लकाष्ठ सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लाग लागल्याने भाऊ-भाऊ एकमेकाच्या मुळावर उठत आहे.परिणामी पोलिस ठाण्यात गुन्ह्याचा दर वाढत आहे.हे पाहण्यास कोणास वेळ भेटत नाही.रस्त्यांची मागणी आणि निकाली निघालेल्या प्रकरणाचा तपास केला तर वास्तव लगेच पुढे येईल.पुरवठा विभागात चाललेल्या सावळ्या गोंधळाच्या तक्रारी थेट मंत्रालयात जातात.पण येथील झारीतील शुक्राचार्य कोण येथील डोळे झाकून दूध पित बसलेल्या अधिकाऱ्यांना माहिती नाही.सत्ताधारी गटाचे किती बोके यात पोसले जातात हे सत्ताधाऱ्यांना माहिती नाही असे कसे होईल बुवा ! तीच बाब अवैध व्यावसायिकांची आहे.पोलिस अधिकाऱ्यांच्या नाकाच्या शेंड्याखाली हे नसते उद्योग सुरू असताना ते झोपेचे सोंग घेत असतील तर याला जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना -२ हिचे कागदपत्र करण्यास महसूल विभागाला दिड पावणेदोन वर्षे वेळ भेटत नाही.शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचे शुक्लकाष्ठ सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लाग लागल्याने भाऊ-भाऊ एकमेकाच्या मुळावर उठत आहे.परिणामी पोलिस ठाण्यात गुन्ह्याचा दर वाढत आहेयाला जबाबदार कोण?
उत्तर नगर जिल्ह्यातील आणि कोपरगाव तालुक्यातील नेते केवळ स्वतःला हिरण्यकश्यपू सारखे भगवान घोषित करायचे बाकी राहिले आहे.वर्तमानात गणेशोत्सव सुरू आहे. त्याठिकाणी भगवान श्री गणेशासमोर यांच्या १५-२० फुटाच्या प्रतिमा पाहिल्या की याची साक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही.बिचारे गणपती बाप्पा त्यांच्या पुढे फारचं खुजे वाटतात.बिचारे गणपती बाप्पा! त्याला कारण गल्लोगल्लीच्या गणेश मंडळांनी पारच लाज सोडली असल्याचे दिसत आहे.आपण धार्मिक कार्य करतो,जनतेत आदर्श असलेल्या टिळकवादी आदर्शवादी चांगल्या रुढी परंपरा मांडतो की मद्य सम्राटांचे उदात्तीकरण करतो याचे भान राहिलेले नाही. कोपरगाव शहरातील दिवसाढवळ्या होणारे विद्रुपीकरण हा सांप्रत युगात न संपणारा विषय.सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना एक जन्म यासाठी अपुरा ठरावा.यावर एकही नेता बोलणार नाही.त्यामुळे पैसे घेऊन मतदान करणारे मतदार आणि ते देऊन मते विकत घेणारे पुढारी एकच माळेचे मणी.त्यांचेकडून वेगळी अपेक्षा करण्यात काय हशील ! आता नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्याने हे कोडकौतुक होणार आहे.पुढील वर्षी ना गणेश मंडळे कोणाला आठवणार ना नवरात्र उत्सव मंडळे.हे असेच मागील पानावरून पुढे सुरू राहणार आहे.मध्ययुगात एक म्हण होती,’ यथा राजा तथा प्रजा’ आता त्यात लोकशाही आल्याने बदल झाला इतकेच.त्यात सुधारणा करून “यथा प्रजा,तथा राजा”म्हटले पाहिजे दुसरे काय ? आम्ही मारल्यासारखे नाटक करतो तू रडल्यासारखे कर’ असाच याचा मतितार्थ.त्यामुळे या जनता दरबारांकडे जनतेने करमणूक म्हणून पाहणे इष्ट.



