अर्थ विषयकसंपादकीय
आ. काळेंना मंत्रिपद भेटणार…!

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी युती आणि त्यांचे मित्र पक्ष धाकटे पवार यांचे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दुसऱ्यांदा वीजयी झालेले उमेदवार आशुतोष काळे यांचेही अभिनंदन.त्यांनी पहिल्या पंचवार्षिक मध्ये जी कामे केली त्यास एका अर्थाने समाजमान्यता मिळाली असे म्हंटले तर वावगे वाटू नये.त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात पालिकेचा पाच क्रमांकाचा तलाव बांधून पूर्ण केला त्यास हे श्रेय निर्वाविवाद जाते.एरव्ही पाण्यासाठी शहर वासिय नको इतके त्रासून गेले होते.हे नव्याने सांगायला नको.

आ.आशुतोष काळे यांनी जो दैदिप्यमान विजय मिळवला तो नक्कीच कौतुकास्पद आहे.मात्र त्यांच्या या विजयाबरोबर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.कारण आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाचे पाणी मिळालेले नाही.शंभर वर्षापूर्वी शेती सिंचासाठी इंग्रजांनी बारमाही ब्लॉक दिले पण आज पाणी शिल्लक राहिलेले नाही.त्यासाठी सन-१९६९ साली काढून घेतलेली ‘सीलिंग’ची जमीन सरकारने दिली नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात महायुतीस मोठे बहुमत मिळाले असल्याने आता भाजपाच्या नेत्यांकडून देवेंद्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी लावून धरण्यात येत आहे.मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही असं समोर येत आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला आमचा पाठिंबा आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे.मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम राहावे अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे.भाजपाने या निवडणुकीत १३२,शिवसेनेने ५७ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानावर प्रचार सभेचा संदर्भ देत आ.काळे मंत्री होणार ही कार्यकर्ते मंडळीनी हाकाटी पिटली आहे.त्यावर ही मंडळी थांबली नाही त्यांनी ‘भावी मंत्री…’ आणि ‘नामदार …’या उपाध्या लावून तसे फ्लेक्स शहर आणि तालुकाभर लावले आहे ते खरे ठरले तर दुधात साखर मानली पाहिजे.त्यामुळे तालुक्यातील अनेक दशकांचे प्रश्न निकाली निघतील असा आशावाद करायला हरकत नाही.
दरम्यान दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होणार असून त्या बैठकीत मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होईल.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रिपदासाठी मागणी सुरू आहे.अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावे अशी शिंदेसेनेच्या आमदारांनी आग्रह धरला आहे.परंतु दिल्लीत आजच्या बैठकीत पुढील निर्णय होणार आहेत.त्यामुळे संध्याकाळपर्यंत राज्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून राज्याला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.इकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघात आ.आशुतोष काळे यांना ‘न भूतो..’ असा विजय मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत मोठा आनंद असणे स्वाभाविक आहे.मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानावर प्रचार सभेचा संदर्भ देत आ.काळे हे मंत्री होणार अशी हाकाटी पिटली आहे.त्यावर ही मंडळी थांबली नाही त्यांनी ‘भावी मंत्री…’ आणि ‘नामदार …’या उपाध्या लावून तसे फ्लेक्स शहर आणि तालुकाभर लावले आहे.या विजयात माजी आ.कोल्हे आणि युवराज,राजेश परजणे,विजय वहाडणे,शिंदे सेना,यांचे निर्विवाद योगदान आहे.त्यांना आगामी काळातील नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकात याचे भान ठेवावे लागणार आहे.ते तसे ठेवणार का ? हा यक्ष प्रश्न असला तरी राजकारणात जर तरला काही किंमत नसते.आणि भिकेत कोणी कोणाला राज्य देत नाही हे राजकारणातील नागडे सत्य आहे.त्यामुळे त्यात आम्हाला कोणाच्या आनंदात विरजण घालण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.डॉ.आंबेडकरांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की,”हिरावून घेतलेले हक्क भीक म्हणून मिळत नाहीत.हक्क वसूल करावे लागतात” अशी स्थिती कोल्हे यांचे वर न येवो..’ अशी ईश्वराकडे प्रार्थना करण्यास त्यांच्या कार्यकर्त्यांना काही हरकत नाही.आम्ही या आधीच विहिरीत असलेले पाण्याचा उपसा केला नाही तर ते पाणी अन्य वाटा शोधत असते हे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विसरता येणार नाही.या कार्यकर्ता रुपी पाण्यास त्यांनी अन्य मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे.तो मार्गावरून ते खरच परत येथील आणि आले तरी सर्व येतील का ? हा त्यांचेसाठी कोपरगाव शिवसेना आणि भाजप यांचा पूर्व इतिहास पाहता आगामी काळातील यक्ष प्रश्न ठरणार आहे.त्याचे उत्तर काही महिन्यासाठी अनुत्तरीत राहणार असले तरी ते त्यांच्या राजकीय धुरिणांना द्यावे लागणार आहे.
दरम्यान तालुक्यातील कोल्हे गटास राज्यसभा अथवा विधान परिषद मिळणार का ? हा ही असाच यक्ष प्रश्न आहे.त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचेसह कोणास काही हरकत नसावी.त्याचे उत्तर भाजपचे दिल्ली आणि मुंबईस्थित धुरीण देणार आहे असो ! त्यास नाक खुपसण्याचे आज तरी काही कारण नाही.मात्र बऱ्याच वेळा राजकारण हे इतके द्वाड क्षेत्र आहे की,इथे वापर संपल्यावर थेट बापाला पायदळी तुडविले जात असते याला इतिहास साक्ष आहे असो.इथे आज आ.आशुतोष काळे यांनी जो दैदिप्यमान विजय मिळवला तो नक्कीच कौतुकास्पद आहे.मात्र त्यांच्या या विजयाबरोबर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.कारण आजही तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाचे पाणी मिळालेले नाही.शंभर वर्षापूर्वी शेती सिंचासाठी इंग्रजांनी बारमाही ब्लॉक दिले पण आज पाणी शिल्लक राहिलेले नाही.त्यासाठी सन-१९६९ साली काढून घेतलेली ‘सीलिंग’ची जमीन सरकारने दिली नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शिवाय नगरपरिषद हद्दीत वितरण व्यवस्था अद्याप सडलेली आहे.त्यावर त्यांना मात करावी लागणार आहे.पाणी चोरी हा गंभीर विषय हाताळावा लागणार आहे.तालुक्यातील नगर मनमाड, सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्याची मंद झालेली गती,झगडेफाटा-संगमनेर आणि वाकडी आदी सह अनेक नादुरुस्त रस्त्यांची समस्या गंभीर आहे.तालुक्याला शेती सिंचनाला कमी झालेले पाणी पूर्ववत करणे ही मोठी समस्या आहे.त्यासाठी सरकारने पश्चिमेचे पाणी तीस वळण योजनेद्वारे प्रस्तावित केले असले तरी ते पाणी मतांसाठी मराठवाड्यात सिंचन करण्याचे काम भाजपने मनोभावे सुरू केले आहे.अपर वैतरणा धरणाचे साडे दहा टी.एम.सी.पाणी थेट मराठवाड्यात देण्याची घोषणा याच देवेंद्र फडणवीस यांनी केली या बातमीची शाई अद्याप वाळलेली नाही.त्यामुळे औद्योगिक वसाहत आणि त्यासाठी दिलेले पाणी यामुळे आणखी शेती सिंचनाच्या पाण्यात कपात झालेली आहे.याकडे कोणीही लक्ष वेधलेले नाही.त्या संघर्षासाठी निधडी छाती लागणार आहे.गोदावरी नदीचे गंभीर प्रदूषण ही मोठी समस्या आहे.त्यासाठी त्यांना ज्या सहकाऱ्यांनी मदत दिली त्यांना दुखावण्याचे धाडस त्यांच्या अंगी येईल का ? कोपरगाव नगर परिषदेचे दूषित पाणी थेट गोदा-गौतमी या पवित्र नदीत जात आहे.एवढच नाही तर गोवंश हत्येचे रक्ताचे पाट नदीत राजरोस सोडले जात आहे.याबाबत त्यांचे सहकारी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.त्यात श्रीक्षेत्र सरला बेट’चे महंत यानीची आवाज उठवलेला आहे.मात्र गत पाच वर्षात त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.राहता राहिला तालुका प्रशासनाचा गंभीर आहे.त्यावर त्यांचे यशस्वी नियंत्रण आहे असे म्हणणे धाडसाचे होईल.अलीकडे भर दिवसा झालेला गोळीबार ही समस्या तालुक्यात रेशन घोटाळ्याचे अपत्य आहे हे जगजाहीर आहे.आणि त्यात त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील आहे हे दिवा घेऊन सांगण्याची गरज नसावी.त्यासाठी त्यांना आपली संघटना बळकट करताना,’ नासके आंबे’ दूर करण्याचे धाडस करावे लागणार आहे.नाही तर अख्खी अढी नासुन जाण्याचा धोका आहेच.शेती मालाचे स्वामिनाथन समितीने केलेल्या शिफारशी प्रमाणे देण्याचे शेतमाल भाव,कांदा भाव आदी प्रश्न आहेच ते लवकर सुटतील याचा सरकारवर कोणाचाही भरवसा नाही.बैल जरी श्रीमंत वऱ्हाडाबरोबर गाडीला जोडून लग्नाला गेला तरी वऱ्हाड पक्वान्ने खातात;पण बैलाच्या नशिबी कडबाच येतो’ अशी मतदार संघातील मतदारांची अवस्था व्हायला नको इतकीच अपेक्षा ! त्यामुळे आ.काळे यांचा पाच वर्षांचा कालखंड मात्र इतरांसारखा ठरला नाही हे समाधान आहेच.त्या पूर्वीचा कालावधी वादग्रस्तच मानायला हवा.त्यांमूळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही हरकत नाही त्यांना आगामी यशस्वी वाटचालीसाठी आणि निर्धोक काळासाठी,’न्युजसेवा ‘ वेब पोर्टल कडून खूप खूप शुभेच्छा….!
मोबाईल – 9423 43 9946.