जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

“कोपरगावचे चवदार तळे” …!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
     
कोपरगाव नगरपरिषदेला पाणी पुरविण्यासाठी आता पाच क्रमांकाचा तलाव आता पूर्ण होत आला आहे.त्यातून पाणी गळती रोखली जाईल का आणि रोखली तरी शहरातील चोवीस,अठरा,दहा,आठ तासांच्या अवैध नळ जोडण्या कोण तोडणार हा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून या अवैध नळ जोडण्या तोडल्या नाही तर चाळणीत पाणी टाकल्यासारखी त्याची अवस्था होऊन शहरात पाण्याच्या पुन्हा एकदा ‘ठणठणपाळ’ होण्याची भीती व्यक्त होत आहे.यावर ना कोणी नेता बोलण्यास तयार आहे ना कोणी अधिकारी त्यामुळे या तलावाची अवस्था,’ये रे माझ्या मागल्या…’ झाली तर आश्चर्य वाटावयास नको.

 

माजी मंत्री शंकरराव कोल्हे,डॉ.मिलिंद कोल्हे यांच्या साक्षीने निळवंडे कालवा कृती समितीला,”आपण निळवंडे प्रकल्पात खोडा घालणार नाही”  या शब्दावर समितीच्या दुष्काळी गावातील मतदारांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मदत केली होती.अर्थातच ‘तो’ काही सूर्याजी पिसाळांना हाताशी धरून अर्थातच त्यांनी पाळला नाही.परिणामी त्या विरोधात कालवा कृती समितीने लढा उभा केला होता.

   आ.आशुतोष काळे यांचे स्वप्न असलेला ५ नंबर साठवण तलाव आता पूर्णत्वाकडे जात असल्याचा दावा त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाने नुकताच केला आहे.त्याचा फायदा कोपरगाव शहरातील प्रत्येक छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत व गृहिणीपासून ते सरकारी कर्मचारी असणाऱ्या माता भगिनींना होणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे बाजारपेठेची झालेली दुरावस्था छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी व पाण्यासाठी भेडसावणारी चिंता माता भगिनींनी अनुभवली आहे.परंतु या ड्रीम प्रोजेक्टचे अर्थात ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे आ.काळेंच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असल्यास नवल नाही.अर्थातच या तलावाचा जन्मच मुळी निळवंडे धरणाच्या बंदिस्त जलवाहिनीच्या संघर्षातून झाला हे अनेकांच्या स्मरणात असेल.

 

सन-2016 च्या नोव्हेंबर मधील नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व आमच्या प्रतिनिधीने चार क्रमांकाच्या तलावावर जाऊन तेथील पाईप लाईन मधील,’पाणी चोर’ सप्रमाण उघड केले होते.त्यामुळे त्याचा दणका अर्थातच तत्कालीन सत्ताधारी आणि त्यांच्या साभार पित्याना विधानसभा निवडणुकीत बसला होता.

   सन -2014 च्या विधानसभा निवडणुकीत नंतर पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पायाभरणीसाठी मायावी स्वप्नाची रचना माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली होती.मुळात 44 वर्षे उलटूनही निळवंडे धरणाच्या पाण्याचे स्वप्न दाखवून आपल्या विधानसभा आणि तत्सम निवडणुकीच्या पोळ्या भाजण्याचा उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा (विशेषतः साखर कारखानदारांचा) हा आवडता छंद होता.त्याला छेद दिला तो निळवंडे कालवा कृती समितीने ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून नानासाहेब जवरे व विक्रांत काळे यांची जनहित याचिका दाखल करून आणि लोकलढा उभारून.

   यामागे अर्थातच माजी मंत्री शंकरराव कोल्हे,डॉ.मिलिंद कोल्हे यांच्या साक्षीने निळवंडे कालवा कृती समितीला,”आपण निळवंडे प्रकल्पात खोडा घालणार नाही”  या शब्दावर समितीच्या दुष्काळी गावातील मतदारांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मदत केली होती.अर्थातच ‘तो’ त्यांनी आपल्या लौकिकाप्रमाणे पाळला नाही ;काही सूर्याजी पिसाळांना हाताशी धरून.परिणामी त्यानंतर कालवा कृती समितीने सरकारला आणि त्यांना उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात सरकार खेचले होते.तो पर्यंत कोपरगाव शहरात बंदिस्त जलवाहिनीच्या पिपाण्या जोरजोरात वाजत होत्या.आणि “शहरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा मी उतरवणार…! अशा बऱ्याच काही आणाभाका होत होत्या.मात्र हा फुगा समितीने सन-2019 च्या निवडणुकी पूर्वी सप्रमाण फोडला होता.त्यामुळे शहरातील व्यापारी आणि मतदार आदींनी या थोतांड नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती.त्यातच सन-2016 च्या नोव्हेंबर मधील नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व आमच्या प्रतिनिधीने चार क्रमांकाच्या तलावावर जाऊन तेथील पाईप लाईन मधील पाणी चोर सप्रमाण उघड केले होते.त्यामुळे त्याचा दणका अर्थातच तत्कालीन सत्ताधारी आणि त्यांच्या साभार पित्याना बसला होता हे नव्याने सांगण्याची गरज नाही.त्याचा परिणाम असा झाला की आगामी निवडणुकीतील उमेदवार अर्थातच त्यातून बोध घेऊन जागे झाले होते.त्यांनी ‘पुढच्यास ठेच मागील शहाणा’ असा बोध घेऊन या तलावाची जाहीर घोषणा केली होती.ते अर्थातच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आशुतोष काळे हे होते.त्यावेळी आमच्या प्रतिनिधीनेआणि समितीने वेळोवेळी “कोपरगाव शहराला पाणी कमी नाही” असे स्पष्ट बजावले होते.

 

जलसंपदा विभागाने आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून माजी आ.कोल्हे यांची बोलती बंद करण्यासाठी त्यांनी 131.24 कोटी रुपयांचा साठवण तलावासाठी निधी मंजूर करून डिसेंबर २०२१ रोजी ३.३२ द.ल.घ.मी.पाणी दारणा धरणावर पाण्याचे आरक्षण टाकले असून आता कोपरगाव शहराचे पाणी आरक्षण हे ५.९६ वरून अधिक ३.३२ म्हणजे ९.२८ द.ल.घ.मी.असे विक्रमी पातळीवर पोहचले.

  कोपरगाव शहराच्या पिण्यासाठी 1992 पासून शहराचे पाणी आरक्षण हे ५.९६ होते.पैकी यातील चाळीस टक्के पाणी वापर होत नव्हता.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते.(कागदपत्रिय माहितीनुसार ) तरीही पाणी कमी पडते अशी सोयीस्कर आवई ईशान्य गडावरून उठवली गेली होती.पण वास्तव तसे नव्हते.वास्तव हे होते की,शहराच्या पाणी साठवण तलाव आणि अशुद्ध जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत होती त्यात रक्षकच भक्षक बनले होते.दुसरे कारण हे होते शहरातील सदोष जलवाहिन्या,तिसरे कारण होते ते शहरात दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्ते आणि समर्थक आदींनी मुख्य जलवाहिन्या वर चोवीस,अठरा,दहा आणि आठ तास सुरू ठेवलेल्या नळ जोडण्या व अनेकांना दुहेरी नळ जोडण्या,चौथे कारण होते शुध्दीकरण प्रकल्पाची कमी क्षमता.या चार कारणांनी शहर पाण्याचा बट्ट्याबोळ झाला होता.पण यात राजकीय सोयीसाठी कोणीही सत्य बोलण्याचे धाडस कोणीही करत नव्हते.उलट यात आपल्या स्वार्थाची संधी शोधून पाणी कमी असल्याची आवई उठवून संगमनेर शहराच्या नेत्यांचा आदर्श (?)कित्ता गिरवत बंदिस्त जलवाहिनीच्या नावावर आपल्या दारू कारखान्यासाठी षडयंत्र आखले गेले होते.त्याला जनतेच्या मागणीचा मुलामा दिला जात होता.तर त्यात त्या नेत्यांच्या सुरात सुर मिसळून त्यांचे कार्यकर्ते डोळे झाकून पिपाण्या (आजच्या भाषेत तुताऱ्या ) वाजवत होते.

 

बंदिस्त जलवाहिनी रद्द करून शिर्डी येथील साई संस्थानचे अडीचशेहून अधिक कोटी (263 ) व कालव्याच्या नावावर 500 (पाचशे)  कोटी असा साई संस्थानचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी निळवंडे कालवा कृती समिती व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वाचवला आहे यात कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही हा एक प्रकारे साई संस्थानवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा होता.

  कोपरगाव शहराच्या पिण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला  यश येवून माजी आ.कोल्हे यांची बोलती बंद करण्यासाठी त्यांनी डिसेंबर २०२१ रोजी ३.३२ द.ल.घ.मी.पाणी दारणा धरणावर पाण्याचे आरक्षण टाकले असून आता कोपरगाव शहराचे पाणी आरक्षण हे ५.९६ वरून अधिक ३.३२ म्हणजे ९.२८ द.ल.घ.मी.असे विक्रमी पातळीवर पोहचले असून असले तरी कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावरील नेत्यांच्या कार्यकाळात इंडिया बुल्स या महाकाय कंपनीने तब्बल 3.5 टी.एम.सी.पाणी त्यांच्या नाकाखालून सांडपाण्याच्या नावाखाली काढून घेतले त्यावेळी मिठाची गुळणी धरणाऱ्यानी उच्च न्यायालयात,”शेतीचे पाणी कमी होणार”असा जावई शोध लावून व वरून ऊर बडवून याचिका दाखल केली होती.त्याला उच्च न्यायलयाने वैतागून त्यांना फटकारले होते.त्यात आता या कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर जर नाव बदलून याचिका दाखल केली तर दंडात्मक कारवाई केली जाईल असे तत्कालीन छ.संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने स्पष्ट बजावले होते तरीही या मंडळींना शहाणपणा आला नाहीं हे विशेष !

    एक मात्र खरे आहे की,याचा योग्य बोध घेऊन आ.आशुतोष काळे यांनी आपल्याला शेती सिंचनासह या संकटाचा आगामी काळात सामना करावा लागणार ही बाब हेरून त्या दिशेने योग्य पाऊल उचलले होते असे म्हणण्यास जागा आहे.त्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे हे अध्यक्षपदी असल्याने हा तलाव करणे तुलनेने सोपे गेले आहे.याच ठिकाणी ईशान्य गडारील कोणी सयाजीराव स्थानापन्न असते तर ही बाब खूपच अवघड गेली असती.परिणामी 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडल्या पडल्या आ.काळे व तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी या प्रकरणी शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मिळवला होता.त्यात सदर माती उचलण्याचे मोठे महाभारत घडले होते.अर्थातच त्याला ईशान्य गडावरील नेत्या कारणीभूत होत्या.त्यावेळी असलेले भाजप सरकारच्या अंतिम काळात (2019 पूर्वीच्या)त्यांनी आपल्या संबंधांचा पुरेपूर उपयोग (दुरुपयोग) करून घेतला होता.

   दरम्यान यात उच्च न्यायालयात निळवंडे कालवा कृती समितीने बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्न उच्च न्यायालयात आपल्या याचिकेत मांडून साई संस्थानच्या पाचशे कोटीचा गमला त्यांनी उघड केला होता.त्यात शिर्डी येथील साई संस्थानचे अडीचशेहून अधिक कोटी (263 ) व कालव्याच्या नावावर 500 (पाचशे)  कोटी असा साई संस्थानचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी निळवंडे कालवा कृती समिती व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी वाचवला आहे यात कोणाचे दुमत होण्याचे कारण नाही हा एक प्रकारे साई संस्थानवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही त्यास वरील घटकांनी वेळोवेळी जोर लावला होता तर माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,राजेश मंटाला यांनी कागदपत्रीय बळ दिले यात कोणताही वाद होण्याचे कारण नाही.त्यामुळे वास्तव समोर येऊन शहरांतील नागरिक सजग राहिले होते.आता ह सर्व इतिहास झाला असला तरी आपल्याकडे इतिहासातील मडे उकरण्याची काहींची जुनी खोड आहे.व  त्या चुलीवर आपल्या पोळ्या भाजण्यास काही कमी करणार नाही त्यामुळे आगामी काळात जनतेला,” जागते रहो…! ची हाळी द्यावी लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

  या निमित्ताने ‘महाड सत्याग्रह’ न आठवला तर नवल ! हा सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता.यामुळेच २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणूनही आज भारतात साजरा केला जातो.ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती.या सत्याग्रहास,”महाडचा सत्याग्रह” किंवा ,चवदार तळ्याचा सत्याग्रह” म्हणूनही ओळखला जातो.आगामी काळात कोपरगावकरांना या कोपरगावच्या चवदार तळ्याच्या संघर्षाची आठवण नक्कीच येईल यात नवल नाही.

संपर्क – 9423434946.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close