जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
Uncategorized

कुकडीच्या पाण्यासाठी संघर्ष करणार -पोपटराव गावडे

निघोज प्रतिनिधी दी. 16 मार्च
टाकळीहाजी परीसरातील गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून कुकडीचे अधिकारी कालवा सल्लागार समीतीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता जुन्नर तालुक्याला झुकते माप देउन शिरूर तालुक्यातील जनतेवर अन्याय करण्याची भूमिका घेत असून त्यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी पाणी प्रश्नावर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. येथील मिना कालव्याला पाणी सोडताना अगोदर जुन्नर तालुक्यात पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे प्रत्यक्षात जुन्नर तालुक्यात पाणी सोडताना कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समीतीत घेतला गेला होता. या बैठकीला जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, श्रीगोंदा आमदार राहुल जगताप आदी तसेच कुकडीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त असते मात्र कुकडी अधिकाऱ्यांनी जुन्नर तालुक्यासाठी कुकडी नदीला पाणी सोडले असून हे पाणी फक्त जुन्नर तालुक्यातील काठचे गाव असणाऱ्या पारनेर तालुक्यातील रेनवडी पर्यंत येणार आहे. याचा फक्त जुन्नर तालुक्याला होत असून कुकडी नदीचा पारनेरचे व शिरुरचे बहुसंख्य सगळीच गावे वंचित राहात आहेत. सध्या या गावांना पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विषेश म्हणजे गेली पाच वर्षे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे. शेतीमालाला भाव नाही म्हणून या दोन्ही तालुक्यातील शेतकरी दूधउत्पादन मोठय़ा प्रमाणात घेत असतात. आज दुभत्या जनावरांना प्यायला पाणी नाही की खायला चारा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही सर्व परस्थीती कुकडी अधिकाऱ्यांसहीत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. असे असताना फक्त कुकडी नदीला जुन्नर तालुका मर्यादित पाणी सोडून हे अधिकारी कुकडी कालवा सल्लागार समीतीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम करीत असून हा पारनेर व शिरूर तालुक्यातील कुकडी नदी गावाकाठच्या जनतेचा अपमान आहे. या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम हे अधिकारी करीत असून त्यांच्या निर्णयाचा निषेध म्हणून या गावातील जनता तिव्र आंदोलन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहाणार आहे असा इशारा माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close