कामगार जगत
कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार-आश्वासन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निवृत्तीवेतन शिक्षकांचा हक्क आहे तो मिळविण्याच्या लढ्यात मी तुमच्या पाठीशी राहीन.डी.सी.पी.एस.शिक्षकांचे तालुका पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडवू असे आश्वासन कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे यांनी नुकतेच एका शिष्टमंडळाला दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित वैद्यकीय बिले,अर्जित रजेचा पगार शिक्षकांना लवकरात लवकर मिळावा,अंशदायी पेन्शन योजनेच्या हिशोबाच्या बिनचूक पावत्या शिक्षकांना त्वरित मिळाव्यात,आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता नोंद सेवा पुस्तकात घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे यांची शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन दिले त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीत जिल्हा शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे,पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,गट शिक्षणाधिकारी पोपट काळे,गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव मोहिते,शिक्षक समिती चे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कानडे,श्रीराम तांबे,सीताराम गव्हाणे,प्रमोद जगताप,दत्ता गरुड,संजय खरात,आप्पासाहेब चौधरी,लक्ष्मीकांत वाडीले,श्रीकांत साळवे,बाबासाहेब डगळे,विक्रम पवार,रामदास कदम,संदीप नंदेश्वर,बंडू राठोड आदि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.त्यामध्ये तालुक्यातील प्रलंबित वैद्यकीय बिले,अर्जित रजेचा पगार शिक्षकांना लवकरात लवकर मिळावा,अंशदायी पेन्शन योजनेच्या हिशोबाच्या बिनचूक पावत्या शिक्षकांना त्वरित मिळाव्यात,आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता नोंद सेवा पुस्तकात घ्यावी,कै.विलास शिंदे हे शिक्षक निवडणूक कर्तव्य बजावत असताना ह्रदय विकाराच्या झटक्याने मयत झाले होते.त्यांच्या नुकसान भरपाईचा पाठपुरावा शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा,यापुढे निवडणूक आदेश देताना शिक्षकांचे वय व प्रकृती स्वास्थ्य यांची चौकशी करून तहसील कार्यालयाकडे शिक्षकांची यादी द्यावी,कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता तालुक्यातील सर्व शिक्षकांचे लवकरात लवकर लसीकरण करावे,प्राथमिक शाळांचे थकीत वीजबिल भरण्याचे ग्राम पंचायतींना आदेश द्यावेत,वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांना फरकाची रक्कम त्वरित मिळावी,अतिउत्कृष्ट कामाच्या नोंदीने जादा वेतनवाढ मिळालेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये फरक लवकरात लवकर मिळावा आदि मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे.
यावेळी जिल्हा शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले आहे.