जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

  …या संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

  कोपरगांव पेन्शनर्स असोसिएशनचे त्रैवार्षिक अधिवेशन द.मा.ठुबे यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

  सदर कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब कर्पे,भाऊसाहेब लावरे आदींसह कोपरगांव तालुका पेन्शनर्स कार्यकारीणी सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी बहु संख्येने प्रमाणात उपस्थित होते.

  यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.अध्यक्षपदी दिलीप एम. ढेपले तर कार्याध्यक्षपदी गोपिचंद इंगळे तर सरचिटणीसपदीअरुण धुमाळ व उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप ढेपले यांनी केले त्यात त्यांनी तिन वर्षातील संघटनेचे काम संघटनेची आत्ता पर्यत्नची वाटचाल,संघटनेची कार्यपध्दत्ती यावर उदाहरणांसह सविस्तर  माहिती दिली आहे.

  यावेळी त्यांनी तालुक्यात पेन्शनर भुवन संघटनेच्या मालकीचे व्हावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले आहे.

  त्रैवार्षिय  वेतन श्रेणी,शिक्षकांना घरभाडे,केंद्रा प्रमाणे वेतन आयोग,महागाई भत्ता इ म्हणुन आपण सेवानिवृत्त असताना चांगली पेन्शन घेतो.पेन्शनर्सचा तो अधिकार आहे.भविष्य काळात केंद्रा प्रमाणेच पेन्शनर्स ला पेन्शन मिळावी या साठी संघटनेला प्रयत्न करावे लागतील.सरकारने त्यांना न्याय द्यावा असे आवाहन केले आहे.

  सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन रा.भि ठोंबरे यांनी केले तर अध्यक्ष दिलीप ढेपले यांनी उपस्थितांचे  आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close