कामगार जगत
पेंशनवाढीची लढाई शेवटच्या टप्प्यात -…या खासदारांचे सुतोवाच

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
पेन्शनवाढीची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.तुमची मागणी रास्त आहे. हे सरकारला पटले आहे.तुम्हाला पेन्शन वाढ द्यावीच लागेल.निर्णय न झाल्यास,एक दिबस आपण स्वतः काही खासदार घेऊन उपोषणास बसणार आहे.कामगार मंत्र्यांनी सुद्धा लेखी पत्र दिले आहे की,”तुमचे काम लवकर होत आहे. मला खात्री आहे की,”येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल. दि.२१ ऑगस्ट पर्यंत अधिवेशन आहे.त्यासाठी माझे सतत प्रयत्न आहेत असे प्रतिपादन शिर्डीचे खा.भाऊसाहेब बाकचौरे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही अंतिम लढाई आहे.पेन्शनवाढ निश्चित लवकर मिळणार असे कामगार मंत्र्यांनी सांगितले.तरी दिल्ली आंदोलनात सर्वांनी सपत्नीक यावे.लढा द्यावा, म्हणजे लवकर प्रश्न मार्गी लागेल.लढाई जिंकली तरी गुलाल घेण्यासाठी यायलाच पाहिजे.आपल्या लढ्यानेच यश मिळेल”- अशोक राऊत,अध्यक्ष,राष्ट्रीय संघर्ष समिती.
राज्यातील साखर कामगारांचा मेळावा साई किमया गार्डन,शिडी येथे आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी खा.भाऊसाहेब वाकचौरे बोलत होते.
यावेळी प्रांत संघटक अजितकुमार घाडगे,सुभाष पोखरकर,डी.एम. पाटील,पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष अलका मोरे,विजय जगताप,श्रीधर वाल्हेकर,अनिल भांबरे साक्री,कार्याध्यक्ष पुणे दिलीप कहाने,आशाताई शिंदे,कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष भगवंत वाळके,जिल्हाध्यक्ष संपत समिंदर,शिर्डी प्रमुख डी.एस.पवार,समन्वयक डी.एम.पाटील,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र इंद्रसिंग राजपूत,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरविंद भारंबे,संघटक उत्तर महाराष्ट्र बापूराव बहिरट,अर्जुन जाधव,अशोक जोंधळे,आदींसह नाशिक,धुळे,पुणे,सोलापूर,कोल्हापूर आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी अशोक राऊत म्हणाले की,”आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही अंतिम लढाई आहे. पेन्शनवाढ निश्चित लवकर मिळणार असे कामगार मंत्र्यांनी सांगितले.तरी दिल्ली आंदोलनात सर्वांनी सपत्नीक यावे.लढा द्यावा, म्हणजे लवकर प्रश्न मार्गी लागेल.लढाई जिंकली तरी गुलाल घेण्यासाठी यायलाच पाहिजे.आपल्या लढ्यानेच यश मिळेल,अशी ग्वाही दिली.त्यामुळे गाफील राहू नका,असा इशारा शेवटी दिला.

सदर प्रसंगी मेळाव्याचे उद्घाटन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत,जनरल मॅनेजर सुभाष पोखरकर,राष्ट्रीय महिला सचिव सरिता नारखेडे आदींनी साईबाबा प्रतिमेचे पूजन करून केले.अशोक राऊत यांना महात्मा फुले जीवन चरित्र ग्रंथ भेट दिला.स्वागत संपत समिंदर यांनी केले.सुभाष पोखरकर यांनी सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्त साखर कामगारांचे विविध प्रश्नावर सविस्तर विवेचन केले.
यावेळी प्रांत संघटक अजितकुमार घाडगे,सुभाष पोखरकर,डी.एम. पाटील,पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष अलका मोरे,विजय जगताप आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड अध्यक्ष तान्हाजी काळभोर यांनी तर उपस्थितांचे आभार भगवंत वाळके यांनी मानले आहे.