जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

…या संघटनेच्या सभेचे आयोजन होणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची बैठक रविवार,दि.२२ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र सप्तशृंगी गड,कळवण,जिल्हा नाशिक येथे राज्याध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील राजपूत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   

”सदर सभेत ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या सभेचे आयोजन,पुढील वर्षी होणाऱ्या संघटना कार्यकारिणी सन २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिये बाबत चर्चा करणे,संवर्गास जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे,संघटनेची घटना व ध्येय धोरणे यांचा आढावा घेऊन सभासद नोंदणी व व्याप्ती वाढविणे,राज्य व विभागीय कार्यकारिणीतील रिक्त पदे भरणे आदी मागण्या करण्यात येणार आहे”- सुनील राजपूत,जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना.

  सदर बैठकीस राज्यसचिव हरिश्चंद्र काळे (अहिल्यानगर),मधुकर मुंगल (नांदेड) महेंद्र निकम( छत्रपती संभाजी नगर) नारायण पवार (सातारा) सभेस मार्गदर्शन करणार आहेत.

  यावेळी राज्य कार्यकारिणी पदाधिकारी,विभागीयअध्यक्ष,सचिव व पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी तसेच राज्यातील सक्रिय सभासद बांधव सभेस उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेणार आहेत.

   सदर संघटनेच्या मागणीनुसार नुकतेच शासनाने दि.२४ सप्टेंबर,२०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन या पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी करण्यात आले आहे.या निर्णयामुळे संवर्गाच्या वेतनत्रुटी दूर करण्याच्या मार्गातील एक टप्पा सोडविल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनचा ठराव करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक १ जानेवारी,२०१६ पासून काल्पनिक वेतन लागू करून वेतन निश्चितीत एकसमानता येण्याकरिता करिता शुद्धिपत्रक निर्गमित करण्याबाबत मागणीचा पाठपुरावा करणे,ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या सभेचे आयोजन,पुढील वर्षी होणाऱ्या संघटना कार्यकारिणी सन २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिये बाबत चर्चा करणे,संवर्गास जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे,संघटनेची घटना व ध्येय धोरणे यांचा आढावा घेऊन सभासद नोंदणी व व्याप्ती वाढविणेबाबत,राज्य व विभागीय कार्यकारिणीतील रिक्त पदे भरणे व हंगामी जिल्हा कार्यकारणीस मान्यता देणे,नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सन्मान करून जबाबदारी देणे,संवर्गातील पदोन्नती आदी ठराव मंजूर करण्यात येणार आहे.

   यावेळी संघटनेचे पुढील ध्येय धोरणे,गतिमानता,व्याप्ती व कामाची दिशा या विषयावर बैठकित निर्णय घेणार आहेत अशी माहिती नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे व जिल्हा सचिव माया मोढे यांनी दिली आहे.

   यावेळी संघटना पदाधिकारी व सक्रिय सभासद बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष विनोद अहिरे व मार्गदर्शक संजय बाविस्कर व संयोजन समितीने केले असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close