जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दुचाकी चोर पकडले,कोपरगावात चोऱ्या थांबणार का ? सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे सत्र जोरदार सुरु असताना कोपरगाव शहर पोलिसांना नुकतेच दोन चोरट्यांना छत्रपती संभाजी चौकात गणेश सीताराम पावले,(वय-२४)रा.आनंद नगर जेऊर पाटोदा,आकाश जालिंदर पवार (वय-२१) रा.मुर्शतपुर फाटा ता.कोपरगाव आदीना पकडण्यात यश आले असून त्याबाबत नागरिकानी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.

दरम्यान शहर पोलिसांकडून आज समाधानाची खबर आली असून त्यात कोपरगाव शहर पोलिसात जोशीनगर येथील फिर्यादी ज्ञानेश्वर पांडुरंग सैंदाने यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली होंडा पॅशन (क्रं.एम.एच,१७ ए.पी.५६२) हि दुचाकी अज्ञातच चोरट्यानी पळवून नेली होती त्या बाबत त्यांनी तपास करत असताना त्यांना छत्रपती संभाजी नगर चौकात काही संशयित तरुण विना क्रमांकाची दुचाकी वापरताना आढळून आले असता पोलिसांनी त्यांना हटकले त्यात दोन चोरटे पकडले असून त्यांनी ०७ विविध दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.दरम्यान। राजकीय नेतृत्वास जग आली असून या बाबत त्यांना आज त्यांनी बैठक घेतली असल्याचे उशिरा समजले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलीस विभागावर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नसल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात वांरवार चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.कार आणि दुचाकी चोऱ्या या नित्याच्या झाल्या आहेत.अन्य अनेक चोऱ्या सातत्याने सुरु आहे.त्यांची बातम्यांची शाई वाळते न वाळते तो गत महिन्यात कोपरगाव शहरातील कालिंदीनगर या उपनगरात एक मारुती स्विफ्ट डिझायर गाडी चोरी करून आपला प्रताप दाखवला आहे.तर सुधाकर भिकाजी कोळपे त्यांची हिरो होंडा हिरामण हरिभाऊ त्रिभुवन आदींची चांदेकसारे येथून चोरी तर पोहेगाव येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ए.टी.एम.ची वायर रोपच्या साहाय्याने चोरी आदी गुन्हे तालुक्यात राजरोस घडत आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तालुक्यात येवून धाडी टाकत असून हि बाब स्थानिक पोलिसांना खाली मान घालायला लावणारी असल्याची चर्चा नागरिकांत सुरु झाली आहे.यावर राजकीय नेते कोणीही बोलायला तयार दिसत नाही.

“कोपरगाव शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या.त्यामुळे पोलिसांनी शहरात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून कोपरगाव शहराची कायदा सुव्यस्था अबाधित ठेवावी”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

दरम्यान आज समाधानाची खबर आली असून त्यात कोपरगाव शहर पोलिसात नूकतीच एक तक्रार दाखल झाली होती त्यात जोशी नगर येथील फिर्यादी ज्ञानेश्वर पांडुरंग सैंदाने यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली होंडा पॅशन (क्रं.एम.एच,१७ ए.पी.५६२) हि दुचाकी अज्ञातच चोरट्यानी पळवून नेली होती त्या बाबत त्यांनी तपास करत असताना त्यांना छत्रपती संभाजी नगर चौकात काही संशयित तरुण विना क्रमांकाची दुचाकी वापरताना आढळून आले असता पोलिसांनी त्यांना हटकले त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्यांना आपला पोलिसी हिसका दाखवला असता त्यांच्या ताब्यात असलेली विना क्रमांकाची ४० हजारांची दुचाकी जप्त केली आहे.त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या ०७ दुचाकी जप्त केलेल्या आहेत.

त्यात एक करड्या रंगाची होंडा शाईन दुचाकी (इंजिन क्रं.जे.सी.३६ ई ७३५५८९०६) तर लाल रंगाची सिल्व्हर पत्ता असलेली हिरो होंडा पॅशन कंपनीची दुचाकी (इंजिन क्रं.एच.ए.१० ई.डी.बी.एच.जी.१०८८९),एक काळ्या रंगाची हिरवा पट्टा असलेली यामा कंपनीची एफ.झेड.विना क्रमांकाची दुचाकी (इंजिन क्रं.२१ सी.१०५४७२१),एक काळ्या रंगाची हिरवा पट्टा टी.व्ही.एस.कंपनीची दुचाकी (क्रं.एच.एच.२० सी.सी.८२) एक होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर दुचाकी (क्रं.एच.एह.१७ एस.एस.९४५६),एक लाल रंगाची काळा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच.एच.डिलक्स विना क्रमांकाची (इंजिन क्रं.एच.ए.११ई.पी.एच.९बी.१४७९६)या शिवाय एक काळ्या रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एम.एच.२० सी.सी.२४५८) आदी ०७ दुचाकी जप्त केल्या आहेत.

दरम्यान या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.अर्जुन दारकुंडे,पो.कॉ.संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर भांगरे,आदींनी चोख कामगिरी बजावली आहे.त्यांच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close