गुन्हे विषयक
एक लाखांसाठी महिलेचा छळ,कोपरगावात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत शिवारात रहिवासी असलेल्या महिलेला तिचा नवरा दत्तात्रय गोटीराम दवंगे,सासरा गोटीराम सखाराम दवंगे,सासू संजाबाई गोटीराम दवंगे,दिर विष्णू गोटीराम दवंगे,सर्व रा.निमगाव मढ व नणंद सविता सुनील पाठे रा.पारगाव ता.येवला,आदींनी शेतात विहीर खोदण्यासाठी ०१ लाख रुपये आणावे यासाठी तिचा गत दहा वर्षापासून शारीरिक,मानसिक छळ करून तिला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी बाधित महिला विद्या दत्तात्रय दवंगे (वय-२६) हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे संवत्सर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
दिवसेंदिवस समाज प्रगत होत असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या,छळाच्या घटना,त्यांनी दिली जाणारी दुय्यम वागणूक,त्यांचा केला जाणारा शारीरिक आणि मानसिक छळ याविषयीच्या अनेक गोष्टी कायम समोर येत असतात.महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या बाजूने प्रभावी कायदे करण्यात आले असताना अद्यापही ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत विवाहित महिला विद्या गोटीराम दवंगे हिचे बाबतीत घडली आहे.
समाज कितीही सुधारला,प्रगत झाला असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या,छळाच्या घटना,त्यांनी दिली जाणारी दुय्यम वागणूक,त्यांचा केला जाणारा शारीरिक आणि मानसिक छळ याविषयीच्या अनेक गोष्टी कायम समोर येत असतात.महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या बाजूने प्रभावी कायदे करण्यात आले असताना अद्यापही ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.तेथील विवाहित महिला विद्या गोटीराम दवंगे हिचे लग्न दि.२६ डिसेंबर २०१३ रोजी झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी आपले खरे स्वरूप दाखविण्यास प्रारंभ केला असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,”आपल्या पतीच्या शेतात त्यांना विहीर खोदाई करायची असून त्या साठी नवरा दत्तात्रय गोटीराम दवंगे,सासरा गोटीराम सखाराम दवंगे,सासू संजाबाई गोटीराम दवंगे,दिर विष्णू गोटीराम दवंगे,सर्व रा.निमगाव मढ व नणंद सविता सुनील पाठे रा.पारगाव ता.येवला,आदींनी शेतात विहीर खोदण्यासाठी ०१ लाख रुपये आणावे यासाठी आपला गत दहा वर्षापासून शारीरिक,मानसिक छळ करून तिला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला घराबाहेर हाकलून दिले आहे.या प्रकरणी बाधित महिला विद्या दत्तात्रय दवंगे (वय-२६) हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व पाच आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे संवत्सर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.११५/२०२३ भा.द.वि.कलम ४९८,(अ)३२३,५०४,५०६,३४ अन्वये नुकताच गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे अधिकारी हे करीत आहेत.