गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मोर्विस ग्रामपंचायत शिवारात मंगळवार दि.७ मार्च रोजी शेत गट क्रमांक ११२ मधील शेततळ्यात पडून पश्चिम बंगाल मधील तरुण (हल्ली मुक्काम मोर्विस) बुद्धदेव बच्चू वैद्य (वय-२९) या शेत मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्याची या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल मधील मात्र मोर्विस येथे तात्पुरता रहिवासी असलेला तरुण शेतमजूर हा काही काम करण्यासाठी तळ्यावर गेला असता तो परत आला नाही.तो का आला नाही हे पाहण्यासाठी तेथील शेतकरी गेला असता हा दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे.त्यांनी हि खबर कोपरगाव तालुका पोलिसांना तेथील पोलीस पाटलाकरवी कळवली आहे.मात्र त्याच्या मृत्यूचे निश्चित कारण संबंधित चौकशी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने समजू शकले नाही.
राज्यात मजुरांची टंचाई असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बिहार,राजस्थान,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,उत्तराखंड,आदी राज्यातून मजूर येतात.आणि येथे स्थायिक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्यातील अनेक जण पावसाळ्यात निघून जातात तर काही हंगामी व्यवसाय करण्यासाठी येतात.त्यात काही जणांचा कामावर दुर्दैवी मृत्यू होत असतो अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील मोर्विस ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.११२ मधील शेततळ्यात घडली आहे.
सदर बुद्धदेव वैद्य हा मजूर रा.खेरला माठ,बतटला,उत्तर २४ परगणा,निहदरी पश्चिम बंगाल हा काही काम करण्यासाठी तळ्यावर गेला असता तो परत आला नाही.तो का आला नाही हे पाहण्यासाठी तेथील शेतकरी गेला असता हा दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे.त्यांनी हि खबर कोपरगाव तालुका पोलिसांना तेथील पोलीस पाटलाकरवी कळवली आहे.मात्र त्याच्या मृत्यूचे निश्चित कारण संबंधित चौकशी अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ न शकल्याने समजू शकले नाही.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी खबर देणार शेतकरी व पोलीस पाटील सॊमनाथ यशवंत पारखे (वय-५४) यांनी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.१५/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.