गुन्हे विषयक
‘त्या’गुन्ह्यात आणखी तीन आरोपी सामील,ट्रॅक्टर गायब झाल्याची ग्रामस्थांत चर्चा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकमठाण येथील रहिवासी असलेले आरोपी भरत दिपक लोहकणे व मुनिर हुसेन सय्यद आदींनीं समृद्धी महामार्गावरील पुलाजवळील महावितरण कंपनीचे ०१ लाख २९ हजार ४०० रुपयांची महावितरण कंपनीची मोठी चोरी केली असताना व या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना व या गुन्ह्यात आधीच ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला नाही असे असताना या गुन्ह्यात आणखी तीन आरोपी सहभागी असल्याची माहिती असून यात महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारीच शेताचे कुंपण खात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले नूतन पोलीस अधिकारी आता यावर काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.वास्तव समोर येऊन खरे व पांढरपेशे गुन्हेगार समोर आल्यास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असलेल्या वाहन चोऱ्या व छोट्या-मोठ्या चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.या गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगारांचे नातेवाइक संतप्त असल्याची माहिती आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्य सरकारचा सुमारे ५६ हजार कोटी रुपयांचा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार होत असून या प्रकल्पात ५० हून अधिक उड्डाणपूल आणि २४ हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५ पेक्षा जास्त बोगदे,वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे ४०० हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३०० हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येत आहेत.कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.त्यात कोकमठाण येथे एक छेद मार्ग बांधण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यांचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.११ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात केला आहे.उर्वरित शिर्डी ते घोटी या ८० कि.मी.मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याने काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे लोकार्पण या मार्च महिन्याच्या अंतिम चरणात संपन्न होत आहे.त्यासाठी कामाने वेग घेतला आहे.त्या साठी जागोजागी त्यांनी छेद मार्गावर विजेची सोय केली असून महानगरा प्रमाणे छेदमार्गाच्या ठिकाणी महावितरण कंपनीकडून घेऊन वीज वापरली आहे.त्यासाठी जागोजागी विद्युत रोहित्र उभारले आहे.त्यासाठी जमिनीखालून केबल घेऊन आपल्या विजेची गरज भागवली जात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.त्या रोहित्रांवर व केबलवर चोरट्यांची वक्रदृष्टी झाली असून त्यांनी कोपरगाव नजीक छेद मार्गाजवळ असलेल्या पुलाच्या जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला (क्रं.४२१०८३३) खाली पाडून त्यातील ऑइल,तांबे,व पुलाखालून जाणारी केबल आदींवर दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री कधीतरी डल्ला मारला असल्याची बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आली असल्याचे गुन्हा दाखल करताना सांगितले आहे.त्यात १० हजार ५०० किमतीचे ९५ लिटर ऑइल,२१ हजार रुपये किमतीचे त्यातील तांबे,तर या शिवाय ९७ हजार ९०० रुपये किमतीची ३०० फूट केबल असा एकूण ०१ लाख २९ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता त्या बाबत महावितरण कंपनीचे कोपरगाव येथील सहाय्यक अभियंता यज्ञेश महेंद्र शेलार (वय-२८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.९९/२०२३ भा.विद्युत कायदा अधिनियम कलम १३६ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यातील दोन आरोपी जेरबंद झाले असताना त्यांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असताना त्यात आणखी धक्कादायक माहिती हाती आली असून यात शेतच कुंपण खात असल्याचे खात्रीलायक समजते.त्याबाबत गुन्हा करताना आरोपीनी अजूनही काही गुन्हे केले असून एवढी अवजड केबल काढणे मनुष्यबळाने शक्य नाही त्यासाठी ट्रॅक्टरसारखे यंत्र वापरले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आलेली आहे.या आरोपीना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असताना त्यात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत.यातील नावे न आलेल्या तीन आरोपींनी आपले गुन्ह्याच्या दगडाखाली गुंतलेली बोटे सोडविण्यासाठी संबंधित पोलिसांचे हात ओले केले असल्याचे कोकमठाण शिवारात ग्रामस्थांत राजरोस सर्वत्र चर्चिले जात आहे.त्यामुळे आता पोलीस तपास सुरू असून त्यांनी पोलीस कोठडी आहेच त्यात खरे काय त्यापुढे येईल का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.