जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात तरुणीची आत्महत्या ! सर्वत्र हळहळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस साधारण दहा कि.मी.अंतरावर असलेल्या नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या मात्र येवला येथील महाविद्यालयात कला शाखेत उच्च माध्यमिक शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु.भक्ती सुरेश गायके (वय-१८) हिने आज आपल्या राहत्या घरात दुपारी चारच्या सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे नाटेगाव आणि परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मात्र या बातमीस वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

दोन्ही छायाचित्रे संकल्पित.

दरम्यान गावात मात्र आमच्या प्रतिनिधीस मात्र सदर मयत मुलगी हि चक्कर येऊन पडली असल्याची समज पाहायला मिळाली आहे.व त्या कुटुंबाबाबत मोठी सहानुभूती पाहायला मिळाली आहे.मात्र तिने आपल्याच घरात आत्महत्या केली यावर बरेच जण विश्वास ठेवायला तयार नाही.त्यामुळे याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी याबाबत तिचे उत्तरीय आपल्या ताब्यात घेतले असून तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे त्यात खरी स्थिती उघड होणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या सुरेश एकनाथ गायके हे मजुरी व अंगणवाडी येथील खिचडी करून आपली उपजीविका चालविणारे कुटुंब असून घरात त्यांच्या शिवाय पत्नी,एक मोठा मुलगा,मयत मुलगी भक्ती गायके असा परिवार आहे.मयत मुलीचे वडील अपंग असून त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे.मयत मुलगी आज सकाळी महाविद्यालयांत जाऊन आली असताना आज दुपारी तिने आपल्या राहत्या घरात कोणी नाही हि संधी साधत आपल्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.मात्र हि आत्महत्या तिने का केली हे समजायला मार्ग नाही ते लवकरच पोलीस चौकशीत निष्पन्न होणार आहे.

दरम्यान गावात मात्र आमच्या प्रतिनिधीस मात्र सदर मयत मुलगी हि चक्कर येऊन पडली असल्याची समज पाहायला मिळाली आहे.व त्या कुटुंबाबाबत मोठी सहानुभूती पाहायला मिळाली आहे.मात्र तिने आपल्याच घरात आत्महत्या केली की अन्य कारणाने ती मृत झाली हे लवकरच स्पष्ट होणार आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी याबाबत तिचे उत्तरीय आपल्या ताब्यात घेतले असून तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे त्यात खरी स्थिती उघड होणार आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं../२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्याचे काम सुरु आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close