गुन्हे विषयक
…’त्या’अधिकाऱ्यांवर मोठ्या दबावानंतर अखेर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काल पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असली तरी एरव्ही महिलांचा कैवार घेणाऱ्या तालुक्यातील राजकीय नेत्यांनी याबाबत सोयीस्कररित्या मौन पाळले आहे.
दरम्यान सदर फिर्यादी महिला व तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदर गुन्हा दाखल न होण्यासाठी मोठा राजकीय दबाव आणण्यात आला होता.हि बाबत आमच्या प्रतिनिधीस तेथे भेट दिल्यावर प्रकर्षाने जाणवले आहे.मात्र सदर महिला न्याय मिळविण्याच्या इर्षेने पेटून उठल्याने हा गुन्हा अखेर दखल करणे भाग पडले असल्याचे बोलले जात आहे.कोपरगाव येथील तहसीलदार,मालेगाव कडील एक निलंबित तहसीलदार आणि वाळूचोरांचे नाजूक प्रकरण गाजल्यानंतर हा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तालुक्याचे तहसीलदार हे आपल्या अधिकारात अर्ध न्यायिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात.त्यामुळे तालुक्यात त्यांचा विशेष दबदबा असतो.त्यामुळे या घटकाकडे तालुक्यातील नागरिक मोठ्या आशेने आदरयुक्त भावाने पहात असतात.मात्र कोपरगाव तालुक्यात आक्रीत घडले असून येथील तहसीलदार विजय बोरुडे यांनी मद्य प्राशन करून भल्या पहाटे शहरातील पोलीस ठाणे,ग्रामीण रुग्णालय,राज्य परिवहन मंडळाचे बस आगार आदी ठिकाणी आपल्या असभ्य वर्तनाने कहर केला आहे.त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिकेशी असभय वर्तन करून तेथील वैद्यकीय अधिकारी आदींना शिव्यांचा सुकाळ करून टाकला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या कृतीचा अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहिला नाही.या बाबत,’जनशक्ती न्यूजसेवा’ ने सर्वात प्रथम वृत्त दिले होते.त्यामुळे कोपरगावसह नगर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.त्याची दखल नगर येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेऊन त्याचा तत्काळ निषेध व्यक्त केला होता.व बेताल तहसीलदार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.मात्र याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.तो शनिवार दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा मध्यरात्री दाखल झाला आहे.तहसीलदार या जबाबदार पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने असे दुरवर्तन केल्याने त्या कृतीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून तेथील सी.सी.टी.व्ही.फुटेज काढून घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यात तथ्यांश आढळला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.व त्या नंतर सदर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सदर फिर्यादीत बाधित महिलेने म्हटले आहे की,”आपण दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्र पाळीस कर्तव्यावर असताना त्या ठिकाणी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन आले व त्यांनी आपल्याला,”तुमचे अधिकारी कोण आहेत ? असे विचारून फिर्यादीने दिलेला ‘ड्युटी तक्ता’ फेकुन देऊन वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून शिवीगाळ करून फिर्यादीचे सोबत कर्तव्यावर असलेला कक्ष सेवक यास दवाखान्याच्या बाहेर काढून देऊन व आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.तसेच त्या ठिकाणी उपचारार्थ भरती असलेल्या महिलेच्या नातेवाईक मुलीस जवळ बोलावून तिला हि लज्जा होईल असे वर्तन करून शिवीगाळ करून बाहेर निघून गेले असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान सदर फिर्यादी महिला व तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदर गुन्हा दाखल न होण्यासाठी मोठा राजकीय दबाव आणण्यात आला होता.हि बाबत आमच्या प्रतिनिधीस तेथे भेट दिल्यावर प्रकर्षाने जाणवले आहे.मात्र सदर महिला न्याय मिळविण्याच्या इर्षेने पेटून उठल्याने हा गुन्हा अखेर दखल करणे भाग पडले असल्याचे बोलले जात आहे.कोपरगाव येथील तहसीलदार,मालेगाव कडील एक निलंबित तहसीलदार आणि वाळूचोरांचे नाजूक प्रकरण गाजल्यानंतर हा प्रकार पहिल्यांदा घडला आहे.त्यामुळे तालुक्यात याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.सदर प्रकार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात घडल्याने ते व जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार या कडे राज्याचे लक्ष लागून आहे.
रात्री हा गुन्हा फिर्यादी महिलेने दाखल केला असून या प्रकरणी शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.९०/२०२३ भा.द.वि.कलम ३५४,५०४,५०६ अन्वये दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.