गुन्हे विषयक
पस्तीस हजारांचा अपहार,कारकुनासह दोघांविरुद्ध कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेत महाविद्यालयीन शुल्काच्या सुमारे ३५ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात डाऊच खुर्द येथील आरोपी देवीदास नारायण बढे व त्यास मदत करणारा दहिगाव बोलका येथील आरोपी इसम संदीप साहेबराव चौधरी यांचे विरुद्ध फिर्यादी इसम हिरालाल अर्जुन महानुभाव (वय-५५) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेतील दुसरे आरोपी संदीप चौधरी हे पेशाने वकील असून त्याची गंभीर दखल वकील संघाने घेतली असून न्यायालयात सात वर्षाचे आत शिक्षा असलेल्या आरोपीस अटक करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात नाकारले असताना कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस अटक केल्याने कोपरगाव वकील संघाने या घटनेचा बैठक घेऊन शहर पोलीसांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अड्.शिवाजी खामकर यांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसम हे कोपरगाव शहरातील विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेचे पदाधिकारी असून त्यांचे कोपरगाव येथे नामदेवराव परजणे नावाचे कोपरगाव न्यायालयानजीन विधी महाविद्यालय आहे.सदर संस्थेत आरोपी देविदास बढे हा कारकून म्हणून नोकरी करत होता.दि.१४ फेब्रुवारी २०२०चे पुर्वी सदर आरोपी हा त्या संस्थेत कारकुन म्हणून काम करत होता.त्याचे काळात कामकाज करत असताना संस्थेच्या कार्यालयात व विश्वासघात करून कार्यालयीन नवीन प्रस्ताव नस्ती,संस्थेचे शिक्के,इतर महत्वाचे कागदपत्र,पावती पुस्तक,महाविद्यालयीन शुल्काचे सुमारे ३५ हजार रुपये आदी ऐवज स्वतःकडे ठेवून घेतला व दुसरा आरोपी संदीप चौधरी याने माहिती अधिकाराचा वापर करून सदर नस्तीची माहिती माहिती अधिकारात मागवून रुपये ५० हजार रुपयांची खंडनीं मागितली असल्याचा आरोप केला असून,”तू,संस्था कशी चालवतो” अशी भीती घातल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे व आरोपीस अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी हिरालाल महानुभाव यांनी सदर दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या आरोपीस अटक केल्यावर कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.७५/२०२३ भा.द.वि.कलम ४०८,३८५,३४ अन्वये नुकताच गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे अधिकारी हे करीत आहेत.