गुन्हे विषयक
शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू,कोपरगाव तालुक्यातील नातेवाईकांना घातपाताचा संशय !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले तरुण शेतकरी प्रकाश दत्तात्रय माळवदे (वय-३५) यांचे अज्ञात कारणाने मृत्यू झाला असून त्या बाबत त्यांच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय व्यक्त केला असून त्यांनी असून सदर तरुणांची उत्तरीय तपासणी लोणी येथे करावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.त्यामुळे धोत्रे परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी सदर मृतदेह ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यास नातेवाईकांनी हरकत घेतली असून त्यांनी या प्रकरणी (अनैतिक संबंधातून) घातपाताचा संशय व्यक्त होत असून गावात दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरु आहे.त्यामुळे आता पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात रब्बी हंगाम जोरात सुरु असून शेतकऱ्यांची मका व तत्सम पिकांना पाणी देण्याची लगबग सुरु आहे.अशातच कोपरगाव तालुक्यासह राज्यात विजेचा खेळ खंडोबा सुरु आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जीवावर मोठी जोखीम पत्करून रात्री-अपरात्री शेतीस पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे त्यामुळे त्यांच्या जीविताची जोखिम वाढली आहे.त्यामुळे अनेक अपघात होऊन त्यात शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस साधारण २० कि.मी.अंतरावर घडली आहे.त्याचे झाले असे की,”मयत शेतकरी हे दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ ते ०८.३० वाजेच्या सुमारास आपल्या शेतात विद्युत पंप सुरु करण्यास गेले असता त्या ठिकाणी त्यांचा विजेच्या तारेचा धक्का बसून त्यात तार हाताला गुंडालेल्या अवस्थेत मृत्यू झाला आहे.मात्र दोन दिवस होऊनही ते घरी परतले नव्हते त्यामुळे त्यांच्या घरच्या नातेवाईकांनी शोध घेऊनही ते मिळून आले नव्हते.
दरम्यान इकडे त्यांचे घरची मंडळी त्यांना गावशिवार शोधून थकली तरी त्यांचा शोध लागत नव्हता.त्यामुळे ते हैराण झाले होते.त्याबाबत खबर देणार संदीप दत्तात्रय माळवदे यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.०८/२०२३ सि.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद केली होती.पोलीस तपास करत असताना आज सकाळी त्यांना शेजारी असलेल्या शेतकऱ्याने गायब शेतकरी यांचा मृतदेह गट क्रं.४७/३ मध्ये मका पिकाच्या कडेला आढळला असल्याची खबर दिली होती.त्यानुसार त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईक आणि पोलिसांनी धाव घेतली असता त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी सदर मृतदेह ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यास नातेवाईकांनी हरकत घेतली असून त्यांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.याबाबत गावात ग्रामस्थांत अनैतिक संबधातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.व नंतर हातास विजेची तार गुंडाळून अपघाताचा बनाव रचला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आता पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस हटण्याच्या पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.