जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरटा पकडला,३७ हजारांची रोकड हस्तगत,शिर्डीत गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डीत भाजप पक्षाच्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका दाढ खुर्द येथील व्यक्तीचे पाकीट मारून ३७ हजार रुपये लंपास करण्यात आले होते.या पाकीट मारणाऱ्यांचा शिर्डी पोलिसांनी शोध लावून त्यास ताब्यात घेतले आहे व या आरोपी कडून चोरीची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.त्याबाबत नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दाढ खुर्द येथील बाबासाहेब बाबुराव वाडगे हे कार्यकर्ते दोन जानेवारी २३ रोजी शिर्डी येथील भाजप पक्षाच्या निषेध मोर्चासाठी हॉटेल स्वामी रिसॉर्ट येथे आले होते.सदर ठिकाणाहून हा मोर्चा निघाल्यानंतर मोर्चातील गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने त्यांच्या खिशात शेतीचे मशनरी घेण्यासाठी ए.टी.एम.मधून काढलेली ३७ हजार रुपयांची रोकड होती ती लांबवली होती.तेंव्हापासून पोलीस या चोरट्याच्या मागावर होते.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की,”शिर्डी येथे भाजप पक्षाचा निषेध मोर्चा होता.या निषेध मोर्चासाठी राहता तालुक्यातील दाढ खुर्द येथील काही कार्यकर्ते व टाळकरीही सामील झाले होते.त्यामध्ये दाढ खुर्द येथील बाबासाहेब बाबुराव वाडगे हे सुद्धा दोन जानेवारी २३ रोजी शिर्डी येथील भाजप पक्षाच्या निषेध मोर्चासाठी हॉटेल स्वामी रिसॉर्ट येथे आले होते.सदर ठिकाणाहून हा मोर्चा निघाल्यानंतर मोर्चातील गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने त्यांच्या खिशात शेतीचे मशनरी घेण्यासाठी ए.टी.एम.मधून काढलेली ३७ हजार रुपयांची रोकड होती ती लांबवली होती.ते मोर्चामध्ये टाळ वाजवत असताना एका अनोखी भामट्याने त्यांच्या पायजामाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेऊन हे ३७ हजार रुपये चोरून नेले होते.

सदर घटने प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं. ७/२०२३ भा.द.वि. कलम-३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी याचा शोध शिर्डी पोलीस घेत होते.या संदर्भात अधिक तपास करत असताना मोर्चामधील फोटो व्हिडिओ तपासून संशयित आरोपी याची माहिती घेऊन सदरचा पाकीटमार चोरटा हा श्रीरामपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले होते.

सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे सपोनि प्रवीण दात्रे,पोलीस नाईक संदीप गडाख,पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेलार,पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे आदींनी श्रीरामपूर येथे जाऊन सदर आरोपी सनीराज विलास ढोकणे (वय-२८) रा.प्रभाग क्रं.२ श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन गुन्हात चोरलेले ३७ हजार रुपये त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close