गुन्हे विषयक
दोन अपघात,बैलासह एक जण ठार ! कोपरगावात अद्याप गुन्हा दाखल नाही
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस साधारण पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या घारी शिवारा नजीक असलेल्या ठिकाणी रात्री एक पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर (क्रं.एम.एच.१५एच.क्यु.९०८१) हि एका दुभाजकावर धडकून त्यात एक जण ठार झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक येथील रुग्णालयात भरती केले होते तथापि त्यात त्याचे निधन झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला पोलिसानी दुजोरा दिलेला नाही तर काहींच्या माहिती नुसार सदर इसम जखमी झाला आहे.
दरम्यान याच ठिकाणी एक ऊसाची बैलगाडीचा आणि टाटा ४०७ टेंपो यांची धडक होऊन त्यात एक बैल जागीच ठार झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या दोन्ही घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.जखमींना प्रकाश इमानके, रामदास पवार आदींनी सहकार्य केले आहे.
महाराष्ट्रात सध्या महामार्गांचे काम जोमात सुरू आहेत.राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून नाशिक जिल्ह्यातही अनेक रस्त्यांची विकास कामे केली जात आहेत.यामध्ये सिन्नर शिर्डी चौपदरीकरण रस्त्याचा देखील समावेश आहे.या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम केले जात असून ०१ हजार ०२६ कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या रस्त्याचे ८५ टक्के काम हे जवळपास पूर्ण झाले आहे.या रस्त्यावर असलेला टोल नाका हा जानेवारी अखेर कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे रस्ते अपघात कमी होण्याची शक्यता असताना काल कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथील चौफुलीवर एका पाठोपाठ अपघात झाले आहे.त्यात काल दुपारी एक टाटा ४०७ टेंपो आणि कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याची ऊस घेऊन जाणारी टायर बैलगाडी यांच्यात अपघात होऊन या दुर्घटनेत एक बैल जागीच ठार झाला आहे.तर गाडीवरील एक महिला व एक मुलगा जखमी झाला आहे.सदर बैलगाडी ही नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी जवळ असलेल्या पिंप्री येथील असल्याचे समजते.
दरम्यान दि.०६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक मारुती डिझायर या कारची घारी शिवारात श्री सद्गुरू कृपा पेट्रोल पंपाजवळ दुभाजकावर धडक झाली त्यात चालक गंभीर जखमी होऊन त्यास उपचारार्थ नाशिक येथील खाजगी रुग्णलयात भरती केले असता त्यात त्याचे निधन झाले आहे.त्याचे मात्र नाव समजू शकले नाही.सदर इसमाच्या बाबत निधन की जखमी याबाबत दोन मतप्रवाह आहेत.
याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या कारच्या अपघातास दुजोरा दिला आहे.मात्र सदर जखमी नाशिक येथे प्रथम उपचारार्थ दाखल केल्याने सदर गुन्हा दाखल होण्यास उशीर होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान सदर ठिकाणी काही अंतराने तीन अपघात झाले असल्याची माहीती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने सदर दोन्ही ठिकाणचे अपघातग्रस्त वाहनाचे छायाचित्र घटनास्थळी भेट देऊन मिळवले आहे.याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकचा तपशील हाती येईल.
अधिकची बातमी अद्यावत होत आहे…