गुन्हे विषयक
सोने चोर महिलेला ठोकल्या बेड्या,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सोने खरेदीचा बहाणा करून लाखो रुपयांचे ऐवज लुटणाऱ्या महिला आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहे.चारचाकी वाहनासह ४ लाख ६२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात सन-२००६ साली सराफ बाजारात पूर आल्याची आवई उठवून सराफ बाजार मोठ्या प्रमाणात लुटला होता.त्या नंतर छोटया-मोठ्या चोऱ्यांत मोठी वाढ झाली होती.मात्र चोरटे मात्र पोलिसांना सापडत नव्हते.त्यामुळे सराफ बाजारात मोठी काळजी दाटली होती.या घटनेबाबत विविध गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायीकांनीं अनोळखी आरोपी विरुद्ध दाखल केले होते मात्र तपास मात्र लागत नव्हता.
कोपरगाव शहरात सराफ दुकानांमध्ये सोने खरेदीच्या बहान्याने येवुन सोन्याचे दागीने चोरणारे चोरटे कोपरगाव शहर पोलीसांनी पुणे जिल्हयातुन मुद्देमालासह जेरबंद असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत काही महिन्यांपासुन सराफांचे दुकानात सोने खरेदीच्या बहान्याने दोन महीला व पुरूष येवुन सराफ व्यावसायिकांची दागीने खरेदी करण्याचे बहान्याने हात चलाखीने सोन्याचे दागीने चोरीचे सत्र सुरु होते.मागील वर्षापासुन सराफांचे सोने चोरीबाबत गुन्हे उघडकीस येत नव्हते.त्यामुळे सराफ बाजार चिंतेचे सावट पसरले होते.तर नागरिकांत भीती पसरली होती.त्यामुळे पोलिसांपुढे हे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
दरम्यान कोपरगाव शहरात सन-२००६ साली सराफ बाजारात पूर आल्याची आवई उठवून सराफ बाजार मोठ्या प्रमाणात लुटला होता.त्या नंतर छोटया-मोठ्या चोऱ्यांत मोठी वाढ झाली होती.मात्र चोरटे मात्र पोलिसांना सापडत नव्हते.त्यामुळे साराफ बाजारात मोठी काळजी दाटली होती.या घटने बाबत विविध गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायीकांनीं अनोळखी आरोपी विरुद्ध दाखल केले होते मात्र तपास मात्र लागत नव्हता.सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांनी तपास करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले असल्याचे समजते.
सदर गुन्हयातील आरोपी जया सचीन बडगुजर रा.कात्रज भारतनगर,पुणे हीला अटक करुन तीच्याकडे गुन्हयाचा अनुषंगाने विचारपुस करुन तपास केला असता तीने गुन्हाची कबुली दिली आहे.या महिला आरोपीने तीचे साथीदारासह कोपरगाव सराफ बाजारातुन सोन्याचे दुकानातुन चोरलेले दागीने,तसेच गुन्हा कराताना वापरलेले वाहन,मोबाईल फोन असा गुन्हयातील गेला माल तिच्या कडुन हस्तगत केला आहे.तसेच आरोपीने राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारचे सोने चोरी गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झाले आहे.आरोपीने चोरलेला मुद्देमाल ०४ लाख ६२ हजार ८६० रू. जप्त करण्यात आला आहे.तर यातील आणखी तीन आरोपी यात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरिक्षक देसले यांनी सांगितले आहे.
सदर कामगिरी शिर्डी येथील उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.वासुदेव देसले यांसह पोलीस निरीक्षक भरत दाते,पोलिस कॉनस्टेबल सुंबे,काकडे,दिवे,बनकर,धराडे चालक पो.ना.गोडसे,रहाणे,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय,श्रीरामपुर सायबर सेलचे फुरकान शेख आदीनी यशस्वी केली आहे.