गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दोन वाहनांची धडक,एक ठार,एक जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील भास्कर वस्तीजवळ आज दुपारी २.५०वाजेच्या दरम्यान आज आयशर ट्रक व एक कंटेनर या दोन अवजड वाहनात आमने-सामने धडक झाली असून त्यात इंदोर येथील एक आयशर ट्रक चालक दिनेश सुखराम (वय-३०) जण जागीच ठार झाला आहे तर एक दुसऱ्या अशोक लेलंड या कंटेनर मधील हरियाणा येथील ऊन्नाव येथील चालक विजयकुमार राणा (वय-४०) जण किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान उशीराने मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत ट्रक चालक याचे नाव दिनेश सुखराम असे असून तो इंदोर येथील रहिवासी आहे तर त्याचा जखमी सहकारी हा हरियाणा राज्यातील उन्नाव येथील असून त्याचे नाव विजय कुमार राणा (वय-४०)असे असून तो उपचारार्थ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला होता मात्र तो सावरला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर सोडून दिले आहे.
यातील अशोक लेलंड वरील (एच.पी.७२ डी.३१३६) चालक जागीच ठार झाला असून सदर गाडीचा पुढील भाग होत्याचा नव्हता झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.
दरम्यान उशीराने मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत ट्रक चालक याचे नाव दिनेश सुखराम असे असून तो इंदोर येथील रहिवासी आहे तर त्याचा जखमी सहकारी हा हरियाणा राज्यातील उन्नाव येथील असून त्याचे नाव विजय कुमार राणा (वय-४०)असे असून तो उपचारार्थ कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला होता मात्र तो सावरला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर सोडून दिले आहे.ते येवल्याकडून नगरच्या दिशेने जात होते.तर दुसरा ट्रकचालक हा नगर कडून येवल्याच्या दिशेने जात असताना अज्ञात कारणाने तो दुसऱ्या कंटेनर चालक विजय कुमार बालविरसिंग यांच्या कंटेनरला चुकीच्या बाजूने जाऊन जोराची धडक दिली असून आयशर वाहनाच्या नुकसानींस व स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी किरण सिद्धार्थ बागुल रा.भास्कर वस्ती येसगाव यांनी आयशर टेम्पो (क्रं.एम.पी.०९ जी.ई.६२७४) वरील चालकाविरुद्ध गुन्हा क्रं.५२१/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(ब),२७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ )दाखल केला आहे.
दरम्यान या अपघाताने दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.त्यांना काढून देऊन वाहतूक पूर्ववत सुरु करण्यास पोलिसांना मोठी कसरत करावी लागली असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए. एम.आंधळे हे करीत आहेत.