गुन्हे विषयक
भिंगरीसह लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त,कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथून कर्मवीर कारखान्यातून ४१ लाख १९ हजार ०२७ रुपयांचा भरलेला भिंगरी देशी दारूचा मुद्देमाल भरून तो अज्ञातच चोरट्यानी लंपास केला होंता तो लंपास केलेला ट्रकसह (क्रं.एम.एच.१७ बी.वाय.१२४०) ५ आरोपी कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्या बद्दल कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गौरव केला आहे.
कोळपेवाडी येथील कारखान्यातून देशी भिंगरी संत्रा कंपनीचा माल त्यात ७५० बॉक्स भरून ते कोळपेवाडी येथून भरून ते वरील क्रमांकाच्या एल.पी.टी.कंपनीचा ट्रक मध्ये भरून नांदेड येथे तेथील व्यापारी डी.आर.डिस्ट्रिब्युटर यांचेकडे सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या विश्वासाने रवाना केले होते.मात्र वरील आरोपीनी सदरचा माल हा सदर ठिकाणी न पोहचवता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात केला होता.त्या नंतर आरोपी महिनाभर फरार होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी व कोपरगाव शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शैलेश नटवरलाल रायल (वय-६०) रा.वाणी सोसायटी इंदिरापथ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यात म्हटले होते की,”आपण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून आपण कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कारखान्यातून देशी भिंगरी संत्रा कंपनीचा माल त्यात ७५० बॉक्स भरून ते कोळपेवाडी येथून भरून ते वरील क्रमांकाच्या एल.पी.टी.कंपनीचा ट्रक मध्ये भरून नांदेड येथे तेथील व्यापारी डी.आर.डिस्ट्रिब्युटर यांचेकडे सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या विश्वासाने रवाना केले होते.मात्र वरील आरोपीनी सदरचा माल हा सदर ठिकाणी न पोहचवता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात केला होता.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.२९ सप्टेंबर रोजी गुन्हा क्रं.३७६/२०२२ भा.द.वि.कलम ४०७,१२०,(ब)३४ प्रमाणे दाखल केला होता.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवून त्यातील संशयित आरोपींच्या चलचित्रण कॅमेऱ्यांच्या सहाय्याने व सायबर सेलच्या सहाय्याने तपासून आरोपींचा छडा लावला आहे.त्यातील आरोपींनीं त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली असल्याचे निष्पन्न झाले होते.पैकी यांतील ट्रकसह मुद्देमाल २० लाख ५४ हजार इतका जप्त केला आहे.
यातील राहुरी येथील आरोपी सागर पवार यास जेरबंद केल्यावर त्याला आपला हिसका पोलिसांनी दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने अन्य आरोपींचा पत्ता सांगितला असून त्या नंतर पंधरा दिवसांनी अन्य आरोपी जेरबंद केले आहे.यातील आरोपी अनिल जाधव व एक अनोळखी आरोपी अद्याप फरार आहेत.
दरम्यान यातील आरोपी अनिल दिगंबर जाधव रा.वळण ता.राहुरी सागर वसंत पवार (वय-२७),विश्वेवर तथा ईश्वर पांडुरंग पाचारे (वय-४०) रा.कोपरा जानकर,ता.बाभूळगाव जि. यवतमाळ,एक अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही),धीरज घसीटा बालवे (वय-५४) रा.सुखकर्ता सांगवी मेघे.ता.जि.वर्धा यांना नुकतीच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी तुषार धाकराव यांनी अटक केली आहे.त्यांना पो.हे.कॉ.इरफान शेख पो.हे.कॉ.के.बी.सानप यांनी सहाय्य केले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांच्या या यशस्वी कारवाई बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्यासह तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.