जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या संघास तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव येथील तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

‘कबड्डी’ हा एक भारतीय सांघिक खेळ आहे,ज्याचा उगम तामिळनाडूमध्ये झाला.सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये हा खेळ खेळला जातो.यात एकच खेळाडू ज्याला “रेडर” म्हणून संबोधले जाते,तो विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेतो,शक्य तितक्या त्यांच्या बचावकर्त्यांना स्पर्श करतो,आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परत जातो.हे करताना विरोधी संघाच्या सर्व बचावकर्त्यांचा त्याला स्पर्श न होता एका दमात तो परत आला पाहिजे.

पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नगर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कोपरगाव तालुका क्रीडा समिती,संजीवनी सैनिकी स्कूल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ ऑक्टोबर रोजी शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात त्याना हे यश मिळाले आहे.

   या स्पर्धेमध्ये विविध शाळा व महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता.या शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाने विजय प्राप्त केला आहे.या विजयी संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे.

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला विजेतेपद मिळाल्याबद्दल विजयी संघातील सर्व खेळाडूंचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने विश्वस्त संदिप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे,महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.विजयी संघास कनिष्ठ महाविद्यालयाचे शा.शि.शिक्षक एम.व्ही.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close