गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून महिला गायब,पोलिसांत तक्रार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली महिला कुसुम सखाहारी देवकर (वय-६०) या,”आपल्या निफाड येथील भावाला भेटून येते” असे सांगून गेल्या त्या अद्याप घराकडे फिरकल्या नाही.त्यांचा शोध घेऊनही त्या मिळून आल्या नाही अशा आशयाची फिर्याद गायब महिलेचा मुलगा ज्ञानेश्वर सखाहारी देवकर (वय-३३) यांनी दाखल केल्याने टाकळीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात महिला आणि तरुण मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्या मुळें पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.त्यांना शोधणे हि मोठी जोखमीची बाब ठरत आहे.अशीच घटना कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण सात कि.मी.अंतरावर टाकळी गावात घडली आहे.
याबाबत महिलेच्या मुलाने याबाबत हरविल्याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपली कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेली आई सोमवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या घरातून जाताना,” आपण आपला निफाड येथील रहिवासी असलेला भाऊ शंकर निवृत्ती साईकर येथे कामानिमित्त जाऊन येते” असे सांगून घरातून निघून गेल्या आहे.त्यांचा शोध घेऊनही त्या मिळून आल्या नाही.त्यामुळे सादर कुटुंब हादरून गेले आहे.त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी मिसिंग क्रं.५६/२०२२ गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.
_______________________________________________________