गुन्हे विषयक
वाळूचोरांचा एकावर चाकूने मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर शिवारातील शहा रस्त्यावर काल दुपारी एक वाजेच्या सुमारास एका विवाह स्थळी फिर्यादी हा मंडपाच्या बाहेर बसलेला असताना आरोपी गणेश संजय कोळपे,योगेश संजय कोळपे,अशोक शेरमाळे याचा मुलगा (नाव माहिती नाही) हे संगनमत करून आले व त्यांनी फिर्यादिस म्हणाले की,”तू,माझ्याकडे काय बघतोस” असे म्हणून त्यास चाकू,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने हनुवटी व डोळ्यावर,दोन्ही हातावर दोन्ही पायावर छातीवर मारहाण करून,”तुला संपवून टाकतो” असे म्हणून गंभीर दुखापत करून फिर्यदिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा कोळपेवाडी येथील फिर्यादी सुखदेव (सचिन) रामचंद्र कोळपे (वय-३८) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे शहाजापूर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपी गणेश संजय कोळपे,योगेश संजय कोळपे,अशोक शेरमाळे याचा मुलगा (नाव माहिती नाही) हे संगनमत करून आले व त्यांनी फिर्यादिस म्हणाले की,”तू, माझ्याकडे काय बघतोस” असे म्हणून त्यास चाकू,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने हनुवटी व डोळ्यावर,दोन्ही हातावर दोन्ही पायावर छातीवर मारहाण करून,”तुला संपवून टाकतो” असे म्हणून गंभीर दुखापत करून फिर्यदिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे वाळूचोरीशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा कोळपेवाडी येथील पाच चारी येथील रहिवासी असून आरोपी हे शहाजापूर येथील रहिवासी आहे.त्यांच्यात काहि कारणावरून वाद आहेत.दि.२५ मे रोजी दुपारी फिर्यादी सुखदेव कोळपे हा शहाजापुर येथील एका संबंधित लग्नाला गेला असता तो मंडपाच्या बाहेर उभा असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश संजय कोळपे,योगेश संजय कोळपे,अशोक शेरमाळे याचा मुलगा (नाव माहिती नाही) हे संगनमत करून आले व त्यांनी फिर्यादिस म्हणाले की,”तू, माझ्याकडे काय बघतोस” असे म्हणून त्यास चाकू,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने हनुवटी व डोळ्यावर,दोन्ही हातावर दोन्ही पायावर छातीवर मारहाण करून,”तुला संपवून टाकतो” असे म्हणून गंभीर दुखापत करून फिर्यदिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र हणामारीचे खरे कारण समजू शकले नाही.
दरम्यान या प्रकरणी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१८२/२०२२ भा.द.वि.कलम ३०७,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यातील आरोपी गणेश कोळपे यास पोलिसांनी गजाआड केले आहे.तर अन्य दोन आरोपी फरार आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.या घटनेने शहाजापूर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.