गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातच चोरी,दोन चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी शेखर निवृत्ती आहेर (वय-२०) यांच्या मढी रोड लगत असलेल्या वस्तीवर त्यांचे आजी-आजोबा हे घरासमोर झोपलेले असताना सुमारे २० हजार रुपये किंमतीची त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनीं त्यांच्यावर हल्ला करून चोरून नेली असून त्यांना जखमी केले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे माहेगाव देशमुख सह परिसरात खळबळ उडाली आहे.
काल शुक्रवार दि.२९ एप्रिल रोजी ११.१५ वाजेच्या सुमारास आजी लहानुबाई लक्ष्मण राजगुरू (वय-६७) व आजोबा हे मढी रोड लगत झोपलेले असताना रात्री शांतता पसरली असताना आजूबाजूचे सर्व लोक झोपी गेलेले असताना पाळत ठेऊन अज्ञात दोन चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्यांना मारहाण करून पळवून नेली आहे.आ.काळे यांच्या गावातच चोरट्यानी हे आव्हान दिले आहे हे विशेष !
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हे कोपरगाव तालुक्यातील आ.आशुतोष काळे यांचे गाव असलेल्या माहेगाव देशमुख येथील रहिवासी असून ते आपल्या कुटुंबात पति-पत्नी,आई,वडील,मुले असे एकत्र राहतात.त्यांच्या कडे त्यांचे आजोबा आजी हे काही कामानिमित्त आले होते.उन्हाळा व तापमान मोठे असल्याने बहुतेक नागरिक घराबाहेर झोप असल्याने त्याचा चोरट्यानी गैरफायदा घेतला आहे.
काल शुक्रवार दि.२९ एप्रिल रोजी ११.१५ वाजेच्या सुमारास आजी लहानुबाई लक्ष्मण राजगुरू (वय-६७) व आजोबा हे मढी रोड लगत झोपलेले असताना रात्री शांतता पसरली असताना आजूबाजूचे सर्व लोक झोपी गेलेले असताना पाळत ठेऊन अज्ञात दोन चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्यांना मारहाण करून पळवून नेली आहे.त्यावेळी चोरट्यांनीं झटापट केली त्यात फिर्यादीची आजी लहानुबाई राजगुरू यांना चोरट्यांनी दगडाने मारहाण केली आहे.त्यात त्यांच्या डाव्या डोळ्यावर जखम झाली आहे.त्यामुळे माहेगाव देशमुख परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेची त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज सकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा १५१/२०२२ भा.द.वि.कलम ३९४,३४ प्रमाणे अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मर्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करित आहे.