गुन्हे विषयक
रस्त्यावर पाणी सोडल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेने शेजारील शेतातील शेतकऱ्यास सामायिक रस्त्यात पाणी का सोडले ? याचा जाबसाल केल्याने त्याचा राग येऊन तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला असल्याची फिर्यादि महिलेने आरोपी प्रकाश राधाजी औटी व संतोष राधाजी औटी यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने सोनेवाडी परिसरासह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सोनेवाडी येथील फिर्यादी महिलेने रस्त्यावर पाणी सोडल्याची कारणावरून आरोपींना जाब विचारला व “तुम्ही आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाणी का सोडले ? असा सवाल विचारला असता त्यांना राग आला.व त्यांनी सदर महिलेला वाईट-साईट्स शिवीगाळ करून खाली पाडून तिला लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व तिचा गळा व हात धरून तिला जवळ ओढून,”तू,”माझे सोबत चल” असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि सोनेवाडी येथील रहिवासी असून ती आपले सासरे,सासू,पती,दोन मुली,एक मुलगा असे राहतात.ते आपली पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.त्यांचे शेजारी आरोपी प्रकाश औटी व त्यांचा भाऊ संतोष औटी हे बांधभाऊ आहेत.त्यांचा व फिर्यादी यांचा शेताचा एक सामायिक बांध आहे.
शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सांयकाळी ०७ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सामायिक रस्त्यावर शेजारी शेतकरी आरोपी प्रकाश औटी व संतोष औटी यांनी पाणी सोडले होते.त्याबाबत फिर्यादी महिलेने याबाबत आरोपींना याचा जाब विचारला व “तुम्ही आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाणी का सोडले ? असा सवाल विचारला असता त्यांना राग आला.व त्यांनी सदर महिलेला वाईट-साईट्स शिवीगाळ करून खाली पाडून तिला लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व तिचा गळा व हात धरून तिला जवळ ओढून,”तू,”माझे सोबत चल” असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
दरम्यान सदर महिलेचे पती व सासू हे सदर महिलेला सोडविण्यास आले असता त्यावेळी संतोष औटी हा तेथे आला व त्याने सदर महिलेच्या सासूला ढकलून दिले व महिलेच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.व “जर तुम्ही आमचे नादी लागला तर तुम्हाला कुऱ्हाडीने तोडून टाकू” असा सज्जड दम दिला आहे.
दरम्यान सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश औटी व संतोष औटी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आज उशिराने मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपीनी सदर फिर्यादी महिला व त्यांचे कुटुंबिय यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४२/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत.