गुन्हे विषयक
कोपरगावात दुचाकीचोर पोलिसांनी केला गजाआड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला दुचाकीस्वार कोपरगाव तालुका पोलिसांनी नुकताच जेरबंद केला आहे.त्याने चोरून नेलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ एक्स.५९२०) हि त्याच्या ताब्यातून जप्त केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी पोलीस अधिकारी दौलतराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल करून अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुप्त माहितीगार इसमाकडून माहिती मिळवली होती.व चोरट्या विरुद्ध शोध मोहीम सुरु केली होती.त्या प्रमाणे शोध घेतला असता तो चोरटा त्याच गावातील असल्याचे लक्षात आले होते.त्या प्रमाणे त्यांनी सापळा लावला असता त्यांनी येथील भामटा प्रदीप कैलास कदम (वय-२३) रा.पढेगाव यास चोवीस तासात जेरबंद केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव चरमळ यांचे बंधू ज्ञानदेव रायभान चरमळ यांची होरो होंडा स्प्लेंडर कंपनीची वरील क्रमांकाची दुचाकी अज्ञातच चोरट्याने त्यांच्या घरासमोरून दि.०६ एप्रिल रोजी सकाळी ०५ वाजेच्या सुमारास कोणाचे लक्ष नाही हि संधी साधून चोरून नेली होती.त्यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रं.१२३/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला होता.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल करून अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुप्त माहितीगार इसमाकडून माहिती मिळवली होती.व चोरट्या विरुद्ध शोध मोहीम सुरु केली होती.त्या प्रमाणे शोध घेतला असता तो चोरटा त्याच गावातील असल्याचे लक्षात आले होते.त्या प्रमाणे त्यांनी सापळा लावला असता त्यांनी येथील भामटा प्रदीप कैलास कदम (वय-२३) रा.पढेगाव यास चोवीस तासात जेरबंद केले आहे.त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने,पो.हे.कॉ.आबासाहेब वाखुरे,पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील,सायबर सेलचे पो.कॉ.प्रमोद जाधव यांनी सहाय्य केले आहे.पोलिसांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.