गुन्हे विषयक
बोअरची गाडी काढून दिली,दोघांना गंभीर मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले फिर्यादी महिला व त्यांचे पती हे दवाखान्यात उपचारार्थ गेले असताना त्यांच्या मुलाने त्यांच्या मालकीच्या विहिरीत बोअर मारण्यासाठी गाडी आणली असता आरोपी यांनी त्यांची गाडी परत काढून दिली,याचा जाब फिर्यादी महिलेच्या मुलगा संतोष भारूड याने विचारला असता त्याचा राग येऊन चुलत दीर असलेले आरोपी मगन किसन भारूड,त्याची पत्नी मंगल किसन भारूड,त्यांचा मुलगा गौरव मगन भारूड त्यांची सून पूनम गौरव भारूड यांनी काठीने मारहाण करून फिर्यादी सरुबाई अमृत भारूड व त्यांचे पती अमृत भारूड यांना गंभीर जखमी केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बोअरची गाडी आरोपीनी परत पाठवली म्हणून होत असलेले भांडण फिर्यादी महिला व त्यांचे पती हे मध्ये भांडण सोडविण्यास गेले असता मगन भारूड याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी महिलेच्या पतीस तर फिर्यादिस आरोपीची सून पूनम भारूड हिने फिर्यादिस काठीने मारहाण केली व त्यांना गंभीर जखमी केले असून त्यांच्या दोन्ही हाताचे हाड मोडले आहे.
सदरची सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला सरुबाई भारूड (वय-६०) व अमृत भारूड हे दोघे पति-पत्नी असून ते संवत्सर येथील हद्दीतील रहिवासी आहे.त्यांना संतोष भारूड,सतीश भारूड,संदीप भारूड असे तीन विवाहित मुले आहे.सतीश भारूड व संदीप भारूड हे दोघे नोकरी निमित्त पुण्यात राहतात.तर संदीप हा त्यांच्या जवळ रहातो व आपली शेती वहिवाट करतो.व आपल्या आई-वडिलांना सांभाळतो.दि.०४ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे पती हे दोघे आजारी असल्याने कोपरगाव नजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालायत उपचारार्थ गेले असताना त्यांचा मुलगा संतोष हा घरी होता.त्याने विहिरीत बोअर मारण्यासाठी बोअरची गाडी बोलावली होती.त्यासाठी तो विहिरीवर गेला असता.आरोपी दीर किसन भारूड व त्याचा मुलगा गौरव भारूड सून पूनम भारूड आदी तिघे हे त्या ठिकाणी आले व त्यांनी विहिरीवर येऊन फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करू लागले असता फिर्यादीचा मुलगा त्यांना,”तुम्ही शिवीगाळ करू नका” असे समजावून सांगत असताना आरोपी मगन भारूड व त्याचा मुलगा गौरव भारूड यांनी आपला मुलगा संतोष भारूड यास मारहाण करायला लागले.
त्यावेळी फिर्यादी महिला व त्यांचे पती हे मध्ये भांडण सोडविण्यास गेले असता मगन भारूड याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी महिलेच्या पतीस तर फिर्यादिस आरोपीची सून पूनम भारूड हिने फिर्यादिस काठीने मारहाण केली व त्यांना गंभीर जखमी केले असून त्यांच्या दोन्ही हाताचे हाड मोडले आहे.फिर्यादी महिला व तिच्या पतीने आरडा-ओरडा केल्याने त्यांनी घटना स्थळावरून धूम ठोकली आहे.
त्यावेळी फिर्यादीचा मुलगा संतोष भारूड याने आपल्या फिर्यादी आईस व वडिलांना कोपरगाव येथील शहर पोलीस ठाण्यात आणून त्याची खबर दिली पोलिसांनी या प्रकरणी जखमीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.यात फिर्यादी महिला व तिच्या पती या दोघांचे हाताचे हाड मोडल्याचे सिद्ध झाले आहे.ते दोघेही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपल्या दप्तरी गु.क्रं.८० भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करित आहेत.