गुन्हे विषयक
कुत्र्याला दगड मारला,कोपरगावात तिघांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गौतमनगर येथील रहिवासी असलेला फिर्यादी विद्यार्थी फिर्यादी यांने दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१.३० वाजेच्या सुमारास कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून त्याच गावातील आरोपी आरोपी अजय राजू कोळपे,जितेंद्र मच्छु कोळपे,संजू सुरेश कोळपे यांनी आपल्याला लाथा बुक्यांनी व हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारहाण करून हाताच्या बोटाला दुखापत केली असल्याची फिर्याद सिद्धार्थ सुरेश कोळपे (वय १८) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोळपेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी घरा शेजारून क्लासला जात असताना त्याने नजीक असलेल्या व नुकत्याच व्यालेल्या कुत्रीस दगड मारला त्यावरून आरोपी अजय कोळपे व संजू कोळपे यांनी त्यास,कुत्र्याला दगड मारू नका गुपशुप क्लास करा” असे म्हणाले व फिर्यादिस शिवीगाळ करून हाताचे चापटीने,लाथाबुक्यांनी मारहाण करून केली तर संजू कोळपे याने हॉकीच्या स्टिकने फिर्यादिस हाताचे बोटाला मारहाण करून दुखापत केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलगा सिद्धार्थ कोळपे हा शिक्षण घेत असून त्याचे क्लासचे वर्ग आरोपी अजय कोळपे यांच्या घराशेजारी आहे.फिर्यादी हा वरील तारखेस वेळेस घराशेजारून क्लासला जात असताना त्याने नजीक असलेल्या व नुकत्याच व्यालेल्या कुत्रीस दगड मारला त्यावरून आरोपी अजय कोळपे व संजू कोळपे यांनी त्यास,कुत्र्याला दगड मारू नका गुपशुप क्लास करा” असे म्हणाले व फिर्यादिस शिवीगाळ करून हाताचे चापटीने,लाथाबुक्यांनी मारहाण करून केली तर संजू कोळपे याने हॉकीच्या स्टिकने फिर्यादिस हाताचे बोटाला मारहाण करून दुखापत केली आहे.व “तुम्ही गावात कसे राहाता” अशी धमकी दिली आहे.
या प्रकरणी फिर्यादी विद्यार्थी सिद्धार्थ कोळपे याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३८८/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.