जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पुन्हा एकदा गोवंश जनावरे जप्त,नागरिक संतप्त,दोघांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगावातील कसाई समाजातील नागरिकांना गोवंश हत्येचा अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकताच दिला असताना काल मध्य रात्री पुन्हा एकदा ०२ लाख ६४ हजारांचा १८ बैल,२ गायी,३ लहान वासरे असे विविध २३ गोवंश जनावरे नगर-मनमाड मार्गावर अवजड ट्रक मधून (क्रं.एम.एच.१८ ए. ए.०७९१) वाहून नेताना आढळल्याने चालक रिया अली लिकायत मुसलमान (वय-४३),रा.कजगाव,ता.बडगाव जिल्हा जळगाव,हाफिज राहिमा मोहम्मद जाबीर (वय-५७),रा.मुन्शी नगर,मालेगाव,आदी आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात चालकाने दिलेल्या जबानीत,”सदरचा ट्रक हा राजमाने ता.मालेगाव येथून भरून तो बारामती ऍग्रो येथे खाली करण्यासाठी जात होता.व सदर मजूर हे उसतोडी साठी जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांना अडविणे व त्यांची गोवंश जनावरे हि पोलिसांनी अडवून ताब्यात घेणे हे कायदेशीर आहे का ? असा गंभीर सवाल निर्मांण झाला आहे.त्यासाठी त्यांनीं वाहतुकीसाठी पोलीस परवाना का घेतला नाही असा सवाल निर्माण झाला आहे.शिवाय पोलिसांना सदर ट्रक चालकाकडे सदर जनावरे खरेदी विक्री केल्याची पावती आढळली नाही असा आक्रीत दावा केला आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत संजयनगर परिसरात वारंवार अवैध कत्तलखाणे सुरु असल्याचे सिद्ध होत असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल होत आहे.व ते रक्त मिश्रित पाणी पवित्र गोदावरी नदीत जात असून त्याच पाण्याने हिंदू देवदेवतांचा अभिषेक होत आहे.हि अत्यन्त निंदनीय घटना उघड झाली आहे.या बाबत शहरातील हिंदू संघटनांनी नुकताच कोपरगाव नगरपरिषदेवर व शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता.त्यात नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी जबाबदारीचे खापर एकमेकावर फोडले होते.त्याचे पडसाद उमटले असून कोपरगाव नगर परिषरिदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नुकतीच या समाजाच्या शिष्टमंडळाची नगरपालिकेत बैठक घेऊन त्यांना याबाबत कडक समज दिली आहे.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही याबाबत कडक इशारा दिला होता.त्यानंतर हि दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३५ वाजता हि घटना उघड झाली आहे.
“कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील कत्तलखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाची कसाई-कुरेशी समाजाचे शिष्टमंडळासह नगर कार्यालयात घेऊन मिळवलेली आहे.सुमारे एक कोटी रूपये खर्च करून बांधून पडलेला कत्तलखाना हा दुरुस्त करून घेतला.त्यातील मशिनरी सुरू करून घेतल्या आहेत.त्याची रंगरंगोटी-स्वच्छता करून फक्त म्हैसवर्गीय जनावरासाठी कत्तलखाना सुरु सुरू करून दिला आहे.सर्वच नगरसेवकांच्या संमतीने संजयनगर भागात त्यांना मटन विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शिवाय राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही बहुतांश कसाई मात्र संजयनगर परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशहत्या करून संपुर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.त्यातून गायींची राजरोस कत्तल होऊन त्या रक्ताचे पाट थेट नालीतून खंदक नाला व पुढे गोदावरी नदीत वाहत आहे.मात्र याकडे सर्वच राजकीय पक्ष आपल्या मतदानाला धक्का लागायला नको म्हणून तर त्यात प्रशासनाचे आर्थिक दृष्ट्या हात ओले होत असल्याने सविस्तर दुर्लक्ष होत आहे.त्यांना कायद्याशी व हिंदू समाजाच्या भावनांशी काहीच देणेघेणे नाही असे दिसून येत आहे.त्यामुळे नुकताच हिंदू समाजाच्या नागरिकांनी व विविध हिंदू संघटनांनी त्या विरोधात तहसील कचेरीवर मोर्चा काढला होता.त्यात प्रशासनाला या अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यासाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत अखेरची मुदत दिली होती.त्यानंतर हि दुर्दैवी घटना उघड झाली आहे.त्यामुळे शहरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण संतप्त झाले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांना रात्री एक गुप्त खबर मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांना आपल्या सहकार्यामार्फत पाचारण केले होते.त्यांनी नगर-मनमाड मार्गावर त्या बाबत येणाऱ्या वाहनांचा शोध घेतला असता त्यांना वरील क्रमांकाचा एक चॉकलेटी रंगाचा ट्रक आढळून आला. त्यांनी त्यास गाडी थांबविण्याचे निर्देश दिले असता त्याने गाडी थांबवली त्यातील तपासणी केली असता त्यात जप्त ट्रक १० लाख व त्यातील ०२ लाख ६४ हजार रुपये किमतीचे १८ बैल,२ गायी,३ लहान वासरे असे विविध २३ गोवंश जनावरे मिळून १२ लाख ६४ हजारांचा अवैज जप्त केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यातील गोवंश पंचनामा करून कोकमठाण येथील गोशाळेत सोपवला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत फिर्यादी पो.कॉ.दीपक कैलास ढाकरे (वय-३४) यांनी फिर्यादी दिली आहे.

दरम्यान या प्रमाणे कोपरगाव शहर पोलिसांत महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियम कलम ११ (अ),(ड)(ई) (फ),महाराष्ट्र पशु वाहतूक अधिनियम कलम ४७,मोटार वाहन कायदा कलम १८३/१७७,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close