गुन्हे विषयक
राहाता तालुक्यात कालवड फस्त,बिबट्याची मोठी दहशत!
न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव येथे नवसाजी पाटील चेचरे यांच्या वस्तीवरील राहुल विठ्ठल चेचरे या शेतकऱ्यांची बिबट्याने कालवड फस्त केली असून घराजवळील गोठ्यातून बिबट्याने हल्ला करून कालवड फस्त केल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहाता तालुक्यातील लोहगाव परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे येथे बिबट्याला लपण्यास मोठी जागा आहे. सदर घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्या बद्दल मोठी दहशत निर्माण झालेली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. त्या मुळे या भागातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे .लोहगाव परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे येथे बिबट्याला लपण्यास मोठी जागा आहे. सदर घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्या बद्दल मोठी दहशत निर्माण झालेली आहे.बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तत्काळ या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी गणपतराव चेचरे,अनिल चेचरे,लक्ष्मण चेचरे, बाळासाहेब चेचरे,बळीराम चेचरे ,अक्षय चेचरे, रावसाहेब चेचरे,किरण चेचरे,मिनिनाथ चेचरे,कृष्णा चेचरे,आदी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांतही बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. तरी सदर वन खात्यांने या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागण जोर धरू लागली आहे.