गुन्हे विषयक
६९ हजारांची गौणखनिज चोरी,कोपरगावात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.४१४ मधून ट्रॅक्टरच्या माध्यमातून वैधरित्या ६८ हजार ८२३ रुपयांची ६८ ब्रास वाळू मिस्त्रीत मातीचे गौण खनिज चोरी करून नेली असून त्याबाबत दखल घेतली असता सरकारी कामात अडथळा आणून ती आरोपी अविनाश भाऊसाहेब लबडे व त्याच्या अन्य सहा सहकाऱ्यांनी पळवून नेली असल्याची फिर्याद तेथील कामगार वनसंरक्षक रामकृष्ण ज्ञानदेव सांगळे (वय-५५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी हि वाळूमिश्रीत माती नजीकच्या शेतकऱ्यांनी रस्ता नादुरुस्त झाल्याने नेली असल्याची माहिती माहितगार सुत्रांकडून मिळाली आहे.व त्यांनी सदर वाळूमिश्रीत माती हि महसूल विभागात स्वामित्वहक्क कर भरून नेली असतानाही हा गुन्हा वनसंरक्षक यांनी दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून शेतकऱ्यांत या घटनेने असंतोष निर्माण झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उपसा करणे,वाहतूक करणे यास नगर जिल्हाधिकाऱ्यानी प्रतिबंध घातलेला आहे.याची माहिती असूनही रवंदे येथील आरोपी अविनाश भाऊसाहेब लबडे,गणेश बाळासाहेब कदम,सुहास कचरू लामखेडे,गणेश कारभारी लामखेडे,चेतन आबासाहेब लामखेडे,बाळकृष्ण रावजी लामखेडे,कैलास वाल्मिक घायतडकर यांनी दि.२६ जुलै रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास राखीव गट क्रमांक ४१४ मधून वैधरित्या ६८ हजार ८२३ रुपयांची वाळूमिस्त्रीत वाळू चोरून वाहतूक केली आहे.या प्रकरणी तेथील वनसंरक्षक रामकृष्ण सांगळे यांनी त्यास प्रतिबंध केला असता त्यांना दमदाटी केली आहे.व गुन्ह्यात वापरलेले सहा ट्रॅक्टर,ट्रॉली एक जे.सी.बी.घेऊन फरार झाले आहे.या प्रकरणी फिर्यादी वनसंरक्षक रामकृष्ण सांगळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व पो.हे.कॉ.प्रदीप काशीद यांनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध भा.द.वि.कलम ३७९,१८६,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.