जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात चोरीचे सत्र सुरूच,अज्ञात चोरट्याविरुद्ध ८.७० लाखांचा गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दुकान फोडीचे सत्र थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही.नुकतीच येवला रोडला लगत आपले गोदाम असलेले व्यापारी मयूर संतोष कासलीवाल यांच्या दुकानांचे कुलूप तोडून आतील विविध विविध कंपन्याच्या साबनी,कोकोनट खोबरेल तेल,सपाट चहाचे बॉक्स,आदी ०८ लाख ७० हजारांचा ऐवज ज्ञात चोरट्याने लांबवला असून त्याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

नुकतीच गत सप्ताहात महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील नाटेगाव येथील व्यापारी रामदास माधव राजूडे यांच्या शटरचे कुलूप लावण्याचे नाक कापून त्या ठिकाणी साडे सात लाखांची चोरी होऊन त्याच्या बातम्या जनतेपर्यंत जाईपर्यंत शहरातील जुन्या गावठाणातील अनेक ठिकाणी चोरट्यानी आपली लीला दाखवली होती.त्यात कापड बाजारातील राहुल जंगम,हेमंत चव्हाण,किशोर कानडे,सचिन खैरनार,पांडे गल्लीतील श्री पांडे आदींना या चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व त्यांच्या नाकावर टिचून चोरीचा प्रताप करून शहर पोलिसांना आव्हान दिले असतानाच पुन्हा एकदा मयूर कासलीवाल यांची मोठी चोरी उजेडात आली आहे.

कोपरगाव शहरात वर्तमानात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्याचे प्रताप बिनबोभाट सुरु ठेवले आहे.विशेष म्हणजे ते राजरस्त्यावरील आहे ! नुकतीच गत सप्ताहात महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील नाटेगाव येथील व्यापारी रामदास माधव राजूडे यांच्या शटरचे कुलूप लावण्याचे नाक कापून त्या ठिकाणी साडे सात लाखांची चोरी होऊन त्याच्या बातम्या जनतेपर्यंत जाईपर्यंत शहरातील जुन्या गावठाणातील अनेक ठिकाणी चोरट्यानी आपली लीला दाखवली होती.त्यात कापड बाजारातील राहुल जंगम,हेमंत चव्हाण,किशोर कानडे,सचिन खैरनार,पांडे गल्लीतील श्री पांडे आदींना या चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व त्यांच्या नाकावर टिचून चोरीचा प्रताप करून शहर पोलिसांना आव्हान दिले होते.त्याच्या बातम्या अद्याप पूरेपुर प्रसिद्ध झाल्या नसतानाच दि.२७ जुलैच्या रात्री येवला रोडवरील मयूर कासलीवाल यांच्या मालकीच्या संतोष एजन्सी या दुकानांचे शटरचे कुलूप तोडून त्यातील ०५ लाख ६५ हजार ७०० रुपये किमतीचे संतुर साबण ६० बॉक्स (प्रत्येक बॉक्स मध्ये १२० साबण),लायफबॉय साबण १० बॉक्स लक्स साबण (प्रत्येकी बॉक्स मध्ये १२० साबण ),गोदरेज नं.१ बॉक्स साबण (प्रत्येकी बॉक्स मध्ये १२० साबण),१० बॉक्स डेटॉल साबण १० बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १९२ साबण),एक्सपड साबण-७५
बॉक्स (प्रत्येकी बॉक्स मध्ये ७२ नग),८६ हजार रुपये किमतीचे सपट चहा-३५ बॉक्स (प्रत्येकी बॉक्स २२ किलो),१० हजार ९०० रुपये किमतीचे २१ बॉक्स कोकोनट ऑईल (प्रत्येकी बॉक्स १९ किलो),०१ लाख०९ हजार ३०० रुपये किमतीचे त्यात एवरेस्ट मसाला १० बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १५ किलो),बडीसोफ ०४ बॉक्स (प्रत्येकीबॉक्स १५ किलो),जिरे-१० बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १५ किलो),सुपारी ०८ बॅग (प्रत्यकी बॅग १५ किलो) या प्रमाणे एकूण ०८ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.फिर्यादी मयूर कासलीवाल यांनी या प्रकरणी आपल्या हिशेब तपासणी नंतर एक दिवस उशिराने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२३७/२०२१,भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close