गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात गटार तुंबल्याच्या कारणावरून दोन गटात मारहाण,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या आरोपी निहाल अहमद सलीम टकारी,शकील सलीम शेख,अजहर जावेद शेख,वकील जाबीर शेख,सोनू फिरोज शेख (फरार),गफार भिकन शेख (फरार) आदी आरोपीनी गैर कायद्याची मंडळी जमवून घरासमोरील गटार तुंबण्याची कारणावरून हातात काठी घेऊन आपसात मारामाऱ्या करून आयुब इसाक शेख रा. नवनाथनगर धामोरी यास जखमी केल्याची फिर्याद पो.काँ.जयदीप दामोदर गवारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथनगर येथील रहिवाशी आरोपीं आयुब इसाक शेख व निहाल अहमद सलीम टकारी,शकील सलीम शेख,अजहर जावेद शेख,वकील जाबीर शेख,सोनू फिरोज शेख (फरार),गफार भिकन शेख (फरार) आदी आरोपीनीं एकत्र येऊन गटार तुंबल्याच्या कारणावरून हातात काठी घेऊन आपापसात मारामाऱ्या करून लाथाबूक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी करून दुखापत केली आहे.त्याची गंभीर दखल कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घेऊन आरोपींना चाप बसण्यासाठी या बाबत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५१/२०२१ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे वरील सर्व सातही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.