गुन्हे विषयक
घरी आल्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात दोघांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी हा आपल्या दुचाकीवरून आपल्या घरी येत असताना त्याच गावातील आरोपी चेतन सोपान आसने व अन्य त्याच्या बरोबर आलेला एक अनोळखी इसम यांनी आपली दुचाकी अडवून,”तू,महेश बरोबर माझे घरी आला होता.त्याचे परिणाम आता भोग”असे म्हणून वाईट-साईट शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने आपल्याला मारहाण केली असल्याची फिर्याद दीपक कडू मोहन (वय-३५) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पढेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हा काही दिवसापूर्वी आरोपी याचे घरी काही कारणावरून गेला होता.याचा मनात राग धरून आरोपी चेतन आसने याने फिर्यादी दिपक मोहन हा आपल्या घरी दि,२७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याची दुचाकी अडवून त्याला लोखंडी पाईपने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी दीपक मोहन व आरोपी चेतन आसने यांची ओळख असून ते दोघेही एकाच गावातील रहिवाशी आहेत.फिर्यादी हा काही दिवसापूर्वी आरोपी याचे घरी काही कारणावरून गेला होता.याचा मनात राग धरून आरोपी चेतन आसने याने फिर्यादी दिपक मोहन हा आपल्या घरी दि,२७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याची दुचाकी अडवून फिर्यादिस अडवून त्याला वाईट-वाईट शिवीगाळ करून,”तू,महेश बरोबर माझे घरी आला होता.त्याचे परिणाम आता भोग”असे म्हणून वाईट-साईट शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने आपल्याला मारहाण केली आहे.व त्याच्या बरोबर आलेल्या अनोळखी इसमाने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२८/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी चेतन आसने व अनोळखी इसम या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्री.वाखुरे हे करीत आहेत.