गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात डंपर-पिकअप अपघात दोन जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या संगमनेर-कोपरगाव या राज्य मार्गाचा हिस्सा असलेल्या झगडे फाटा ते पुणतांबा फाटा या मार्गावर नाशिक जिल्ह्यातील रिमोल्डिंग टायर घेऊन जात असलेल्या डंपरला (क्रं.एम.एच.०४एच.३४४४) समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपवरील (क्रं.-एम.एच.१५ ई.जी.६७५१) अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून ‘हॉटेल माईल स्टोन’ जवळ समोरासमोर धडक दिल्याने डंपर वरील चालक व फिर्यादी मोहम्मद हमीद हासीम अन्सारी (वय-३९) रा.नांदगाव रोड, पिंजार गल्ली येवला येथील रहिवाशी व त्यांचा सहकारी इरफान उस्मान अन्सारी या दोघांना जखमी केले असल्याची फिर्याद दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पुणतांबा चौफुली ते झगडे फाटा या रस्त्यावरून दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जात असताना समोरून डाऊच खुर्द ग्रामपंचायत शिवारात ‘हॉटेल माईल स्टोन’ या हॉटेल जवळ समोरून कोपरगावच्या दिशेने जात असलेला ‘महिंद्रा पिकअप’ वरील अज्ञात चालक याने जोराची समोरासमोर धडक दिली त्यात फिर्यादी चालक मोहम्मद हमीद हासीम अन्सारी (वय-३९) व त्यांचा सहकारी इरफान उस्मान अन्सारी या दोघांना जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मोहम्मद अन्सारी हे आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाचा रिमोल्डिंग टायर घेऊन जाणारा डंपर घेऊन पुणतांबा चौफुली ते झगडे फाटा या रस्त्यावरून दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जात असताना समोरून डाऊच खुर्द ग्रामपंचायत शिवारात ‘हॉटेल माईल स्टोन’ या हॉटेल जवळ समोरून कोपरगावच्या दिशेने जात असलेला ‘महिंद्रा पिकअप’ वरील अज्ञात चालक याने जोराची समोरासमोर धडक दिली त्यात फिर्यादी चालक मोहम्मद हमीद हासीम अन्सारी (वय-३९) व त्यांचा सहकारी इरफान उस्मान अन्सारी या दोघांना जखमी केले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२२/२०२१ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे पिकअप वरील अज्ञात चलकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासूदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी ससाणे हे करीत आहेत.