गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक दुचाकी अपघात,एकाचे निधन,अकस्मात मृत्यूची नोंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी गजेंद्र राजेंद्र जाधव (वय-२९) यांचा संवत्सर गावाजवळ दुचाकीचा अपघात होऊन त्यात ते जखमी झाले होते.त्यांना उपचारार्थ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.दरम्यान त्यांचे दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१६ वाजता निधन झाले आहे.त्यांचे कागदपत्रे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने त्यांची नोंद अकस्मात मृत्यू दप्तरी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड व मुंबई-नागपूर हे प्रमुख मार्ग असले तरी या शिवाय सावळीविहिर-लासलगाव,कोपरगाव-संगमनेर,पुणतांबा मार्गे कोपरगाव-श्रीरामपूर आदी मार्ग असले तरी या रस्त्यांची अवस्था अत्यन्त दयनीय झाली आहे.त्यातच नगर-मनमाड मार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे.अनेक तरुणांना आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे.या मार्गाचा संवत्सर येथील तरुण बळी ठरला आहे.
कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड व मुंबई-नागपूर हे प्रमुख मार्ग असले तरी या शिवाय सावळीविहिर-लासलगाव,कोपरगाव-संगमनेर,पुणतांबा मार्गे कोपरगाव-श्रीरामपूर आदी मार्ग असले तरी या रस्त्यांची अवस्था अत्यन्त दयनीय झाली आहे.त्यातच नगर-मनमाड मार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे.अनेक तरुणांना आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे.मात्र संवेदनशून्य सरकार,त्यांचे प्रतिनिधी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा निष्काळजीपणा या मुळे या बळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.याचे कोणालाही सोयरसुतक नाही.असाच बळी हा संवत्सर येथील गजेंद्र जाधव या तरुणांचा गेला आहे.या तरुणाला आधी नाशिक येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.मात्र तेथे उपचार करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात अपयश आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पंचवटी,नाशिक पोलिसानी या मृत्यूची अकस्मात मृत्यूची नोंद केली व ती नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची क्रं.१५/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे हे करीत आहेत.