गुन्हे विषयक
भांडणे सोडविण्यास गेल्याने काठी-कुऱ्हाडीने मारहाण,तिघांवर गुन्हा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील फिर्यादी जीवन छगन वाघमोडे यांच्या भाउ सुरेश छगन वाघमोडे यांचा यातील आरोपी संदीप दीपक मुळेकर यास पाणी भरताना धक्का लागला या कारणावरून त्यांच्यात भांडण सुरु असताना त्यावेळी फिर्यादी हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता फिर्यादिस यातील आरोपी सोहेल दीपक मुळेकर,संदीप दीपक मुळेकर,दीपक मांगीलाल मुळॆकर आदींनी हातातील कुऱ्हाड,व काठीने मारहाण करून दुखापत केली व लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यातील फिर्यादीचे भाऊ सुरेश वाघमोडे यांचा आरोपी संदीप मुळेकर यास काल एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाणी भरताना धक्का लागला असता याचा राग येऊन आरोपीं व फिर्यादी यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु असताना सामाजिक कर्तव्य भावना म्हणून फिर्यादी जीवन वाघमोडे हे भांडण सोडविण्यास गेले असता फिर्यादीचा वरील तिन्हि आरोपीना राग आला यातून हे भांडण उदभवले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोल्हेवाडी येथील फिर्यादी जीवन वाघमोडे हे व आरोपी सोहेल दीपक मुळेकर,संदीप दीपक मुळेकर,दीपक मांगीलाल मुळॆकर रहिवाशी आहेत.यातील फिर्यादीचे भाऊ सुरेश वाघमोडे यांचा आरोपी संदीप मुळेकर यास काल एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाणी भरताना धक्का लागला असता याचा राग येऊन आरोपीं व फिर्यादी यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु असताना सामाजिक कर्तव्य भावना म्हणून फिर्यादी जीवन वाघमोडे हे भांडण सोडविण्यास गेले असता फिर्यादीचा वरील तिन्हि आरोपीना राग आला व त्यांनी आपल्या हातातील काठी,कुऱ्हाडीने फिर्यादिस मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.व शिवीगाळ करून दमदाटी केली आहे.या प्रकरणी फिर्यादी जीवन वाघमोडे यांनी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वरील तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीची दखल घेऊन तिन्ही आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५६१/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करित आहेत.