जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद,कोपरगावातील आरोपी सामील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानाजीक असलेल्या नगर-मनमाड या राज्यमार्गावरील कातकडे पॆट्रोल पंपासमोर रात्री बाराच्या सुमारास महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रं.एम.एच.२३ ए. एस.७४५८) व एक एफ.झेड.दुचाकी बिगर क्रमांकाची या वाहनांचा वापर करत व त्यात लोखंडी गज,लाकडी दांडके,दोन लोखंडी कोयते आदींचा वापर करून दारोड्याच्या तयारीत असलेले महेश भाऊसाहेब मंचरे (वय-२४) या सह पाच आरोपिंना कोपरगाव शहर पोलिसानी संशयित रित्या पकडल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे यात कोपरगावातील एक आरोपी गफूर गणी बागवान रा.निंभारा मैदान हाही सामील असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नुकतीच नगर येथे बदली झाल्याने चोरट्यांना रान मोकळे सापडले आहे.त्यामुळे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे दिसू लागले आहे.लूटमार,दंगल,समूहाने गुन्हे करण्याची मानसिकता वाढली आहे.त्यामुळे आता आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी वाढली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नुकतीच नगर येथे बदली झाल्याने चोरट्यांना रान मोकळे सापडले आहे.त्यामुळे शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे दिसू लागले आहे.लूटमार,दंगल,समूहाने गुन्हे करण्याची मानसिकता वाढली आहे.अशातच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे रात्री गस्तीवर असताना त्यांना १०.५० वाजेच्या सुमारास एक महिंद्रा स्कॉर्पिओ संशयित रित्या उभी असलेली आढळली.त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला असता हा चोरट्यांची घाबरगुंडी उडाली असल्याचे त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही.त्यांनी आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे,रा.गोटुंबे आखाडा,ता.राहुरी,सुरज लक्ष्मण वडमारे, (वय-२२) रा.आहेर वायगाव ता.बीड,जि.गेवराई राहुल कुंडलिक बुधनव,(वय-२२) रा.खांमगाव ता.जि. बीड,भारत चितळकर,(पूर्ण नाव माहित नाही)रा.गुंथेगाव ता.गेवराई,जि. बीड, गफूर गनिभाई बागवान रा.निंभारा मैदान,कोपरगाव आदींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे यावरील क्रमांकाची एक महिंद्रा स्कॉर्पिओ जीप एक एफ.झेड. दुचाकी (चेसी क्रमांक एम.१२ सी.जे.९ डी.२००६९७२) तर जीप गाडीत एक लोखंडी गज ६६ से.मी.लांबीचा एक लाकडी दांडके,एक ६० से.मी.लांबीचा पुढील बाजूस वाकडा असलेला गज,एक लोखंडी कोयता ५० से.मी.लांबीचा,दुसरा कोयता ३१ से.मी.लांबीचा राहुल बुधनव याचे ताब्यातील व तीन विवो कंपनीचे तीन भ्रमणध्वनी आदी ऐवज जप्त केला असून यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे (वय-२८) यांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान छापा टाकला त्यावेळी राहुल कुंडलिक बुधनव व गफूर गनिभाई बागवान हे फरार झाले आहेत.त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८१६/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२ प्रमाणे वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close