जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आरोपीकडे तलवार,कुकरी,गुन्हा दाखल,आरोपी अटक!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहराच्या उत्तरेस सुमारे तीन कि.मी.अंतरावर असलेल्या टाकळी फाटा,महादेव मंदिराजवळ आज सकाळी 06 वाजेच्या सुमारास तलवार आणि कुकरीसह एक जण असल्याची गुप्त खबर शहर पोलिसांना मिळाली होती त्या नुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत राम सोमनाथ वायकर (वय-21) या आरोपी विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.त्यामुळे कोपरगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव नजीक आरोपी राम वायकर हा काही गुप्त उद्देशाने टाकळी फाटा या ठिकाणी आपल्या होंडा युनिकॉर्न (क्र.एम.एच.17 सी. टी.6268) दुचाकीत एक कुकरी व एक तलवार घेऊन फिरत असल्याची घटना पोलिसाना एका गुप्त खबऱ्याने दिली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपीला जेरबंद केले  त्याच्याकडून वरील दोन हत्यार जप्त केले आहे.

  कोपरगाव शहर आणि परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे.त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.महिलांचे दागिने ओरबाडून पळणे,घरफोड्या करणे,रस्ता लूट आदी गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या आदेशाने आ.आशुतोष काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात नुकतीच एक आढावा बैठक घेतली आहे.त्यामुळे पोलिसांवर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा दबाव वाढला आहे.त्यातच चोरट्यांत आपसापासात भांडणे उघड होताना दिसून येत असल्याची घटना उघडकीस आली आहे.असताना आज एक गंभीर घटना उघडकीस आली आहे.त्यात आरोपी राम वायकर हा काही गुप्त उद्देशाने टाकळी फाटा या ठिकाणी आपल्या होंडा युनिकॉर्न (क्रमांक एम.एच.17 सी. टी.6268) दुचाकीत एक कुकरी व एक तलवार घेऊन फिरत असल्याची घटना पोलिसाना एका गुप्त खबऱ्याने दिली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपीला जेरबंद केले  त्याच्याकडून वरील दोन हत्यार जप्त केले आहे.यातील फिर्यादीने गुन्हा दखल केल्याने ही घटना उघडकीस आली आहे.या कारवाईबाबत नागरिकांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

गगन हाडा,अध्यक्ष,कोपरगाव शहर शिवसेना(उबाठा)

दरम्यान कोपरगाव शहर आणि परिसरातील वाढत्या चोऱ्या आणि अवैध धंदे याबाबत कोपरगाव शहर (उबाठा)शिवसेनेचे अध्यक्ष गगन हाडा यांनी दंड थोपटले असून या अवैध धंद्यांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा आपण यात कोणाचे हात गुंतले आहे याचा भांडाफोड करणार असून त्यांचे पाठीराखे कोण आहे.याचा विशेष पत्रकार परिषद घेऊन लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद क्रमांक 605/2026 आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close