जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

भोंदू खरातच्या कोपरगावात शेकडो कोटींच्या ठेवी?

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवे कारनामे समोर येत असून आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहे.त्याने अनेक नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती वापरून खरातने कोपरगाव नगरीत मोठे आर्थिक व्यवहार केल्याचा संशय एस.आय.टी.ला आहे.त्यात कोपरगाव येथील अकराशे कोटींच्या ठेवीचा दावा करणाऱ्या एका आघाडीच्या सहकारी पतसंस्थेचे नाव समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.त्यात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने एक खाते असून त्यात हा भोंदूबाबा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून व्यवहार करत असल्याच्या बातम्या दूरचित्रवाणीवर सुरू झाल्या आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात.

कोपरगावात राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या आणि मागील काही महिन्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रमुख पदाची निवडणूक लढवणाऱ्या एका नेत्याच्या संबधित पतसंस्थेचा या प्रकरणाशी संबंध असल्याची जोरदार चर्चा कोपरगाव,अहिल्यानगर आणि नाशिक  जिल्ह्यात सुरू झाली आहे.त्यामुळे आता भोंदूबाबाचे भूत कोणाकोणाच्या मानगुटीवर बसणार हे लवकरच कळणार असल्याचे बोलले जात आहे.

  दरम्यान तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो खात्यांवर स्वतःला ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय असून,हे व्यवहार स्वतः खरातनेच हाताळले असल्याचे संकेत मिळत आहेत.विशेष म्हणजे,काही खात्यांना एकाच मोबाईल नंबरची लिंक असल्याचेही उघड होत आहे.हा नंबर स्वतः अशोक खरात वापरत असल्याचा संशय असून,यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर त्याचे नियंत्रण असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांच्या आणि प्रतिष्ठित वैद्यांच्या घरी या भोंदू अशोक खरातने मुक्काम ठोकून चार-चार दिवस पूजा विधीच्या नावाखाली सोपस्कार केल्याच्या बातम्या असून कोपरगाव बेट येथील एका प्राचीन देवस्थानात नागोबाचे दर्शन घडवल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे सामाजिक स्तर किती मोठ्या प्रमाणावर घसरत चालला याचे दर्शन घडत असून प्रतिष्ठित मानला जाणारा वर्गच अती हव्यासापोटी कोणत्या थराला जात आहे याचे उदाहरण आता लवकरच समोर आले तर वाचकांना आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता राहणार नाही.

  दरम्यान यात रुपाली चाकणकरांच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावानेही खाते असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.रुपाली चाकणकर यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावानेही खाते उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान,खरातशी संबंधित असलेल्या विविध पतसंस्थांची एस.आय.टी.कडून सखोल चौकशी सुरू आहे.या संस्थांमधील व्यवहार,खातेधारकांची माहिती आणि निधीचा प्रवाह याचा तपशील तपासला जात आहे.आता या प्रकरणात नेमकीकोणाचे पितळ उघडे होणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत कोपरगाव शहरातील या संशयित असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षांशी व राज्यात या संस्थांच्या पदावर असल्या पदाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता तो स्थापित होऊ शकला नाही तीच बाब त्यांच्या महाव्यवस्थापक यांचेबाबत घडली आहे.मात्र या पतसंस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख यांचा आज माध्यम प्रतिनिधींना आज सायंकाळी ०५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.मात्र अवकाळी पावसाने त्यांचा हा बेत उधळून लावला असल्याने उद्या सकाळी १० वाजता ही पत्रकार परिषद होणार असल्याने त्यात काय सारवासारव होणार हे उघड होणार आहे.

  

  

दरम्यान याबाबत संबंधित पतसंस्थेचे अध्यक्ष यांचा उशिरा संपर्क स्थापित झाला असता त्यांनी,”आमच्या राज्यात २८ शाखा व लाखो ठेवीदार आहेत.त्यात सहकार कायद्याने सर्व के.वाय.सी.पूर्ण करूनच कायदेशीर पूर्तता करून व्यवहार होत असतात.त्यात कोण कसा हे ओळखणे अवघड आहे.पण आम्हाला आज पोलिसांनी बँक खात्याबाबत माहिती विचारली होती.ती माहिती आम्ही दिली असून ते खाते २०२१ पासून कार्यरत होते.आता त्यात केवळ ३०-३२ लाख रुपये शिल्लक असल्याचा दुजोरा दिला आहे.

   दरम्यान,भोंदूगिरी प्रकरणात अडकलेल्या अशोक खरात याच्याविरोधात आता आणखी एक गंभीर गोरखधंदा उघडकीस येत आहे.बनावट ‘फार्मर प्रोड्यूसर कंपन्या’ स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत शेतमाल खरेदी प्रक्रियेचा गैरफायदा घेत,खरातने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित संबंधांचा वापर करून या कंपन्या उभ्या केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.त्यामुळे हे भोंदू प्रकरण आता कोणाकोणाच्या गळ्याला लागणार हे लवकरच उघड होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close