जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पालिकेची नळपट्टी थकली,कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव नगरपरिषद हद्दीत खडकी येथील रहिवासी असलेले इसम अप्पासाहेब पुंडलिक आराख यांचे घरगुती नळ जोडणी तोडण्याच्या कारणावरून कोपरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी रोहीत विठ्ठल शिंदे,बबलु मरसाळे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.संजयनगर,कोपरगाव यांनी त्यांना लाथाबुक्याने तसेच दगडाने मारुन जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे आरोपी वसुली कर्मचारी रोहीत विठ्ठल शिंदे,बबलु मरसाळे
हे फिर्यादीला रस्त्यात वसुलीबाबत भारत गॅस एजन्सी समोर भेटले होते.त्यांना फिर्यादी समजावून सांगत असताना त्यांच्याशी फिर्यादी चा वाद झाला होता.त्यातून रोहीत विठ्ठल शिंदे,बबलु मरसाळे रा.संजयनगर,कोपरगाव यांनी लाथाबुक्याने तसेच दगडाने मारुन मला जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली असल्याचा आरोप केला आहे.

   वर्तमान काळात वित्तीय वर्षे संपत आल्याने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाचा वित्तीय संस्था आपल्या ग्राहकांकडून,कर्जदारांकडून वसुली करण्याच्या कामास लागले आहे.त्यामुळे सर्वत्र मार्च एंड झाला हा सार्वजनिक संवाद ऐकावयास मिळत आहे.बरेच वेळा ही वसुली समोरचा माणूस हा सरळ असेल तर अडचण येत नाही मात्र दोन्ही पैकी एखादा अडबंग आणि कायदा समजून घेणारा नसेल तर अडचण वाढणार हे नक्की.अशाच काही वेळा बाचाबाचीवर निभावून जाते मात्र काही वेळा जीवावर निभावण्याची वेळ येते.अशीच घटना नुकतीच घडली असून कोपरगाव नगरपरिषद हद्दीत वर्तमानात अधिकाऱ्यांकडून वसुलीचा तगादा सुरू आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना विश्रांती अजिबात नकोचे आदेश झाले आहे.त्यामुळे कर्मचारी अविश्रांत वसुली करत आहे.अशीच वसुली करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी रोहीत विठ्ठल शिंदे,बबलु मरसाळे हे दोघे खडकी या ठिकाणी गेले असता घरी घरमालक नसल्याने फिर्यादी अप्पासाहेब आराख यांच्या मुलगी प्रज्ञा हिने आपल्या वडीलांना ही खबर आपल्या भ्रमणध्वनीवरून दिली होती.त्यावेळी फिर्यादी हे तातडीने आपल्या घरी निघाले होते.त्यांना आरोपी कर्मचारी हे त्यांना रस्त्यात भारत गॅस एजन्सी समोर भेटले होते.त्यांना फिर्यादी समजावून सांगत असताना त्यांच्याशी फिर्यादी चा वाद झाला होता.त्यातून रोहीत विठ्ठल शिंदे,बबलु मरसाळे रा.संजयनगर,कोपरगाव यांनी लाथाबुक्याने तसेच दगडाने मारुन मला जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली आहे.त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   दरम्यान याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रं.-165/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1),115(2),352(3)(5) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close