गुन्हे विषयक
प्रेम संबंधातून एकाचा खून,चार आरोपी अटक !

न्यूजसेवा
कोपरगाव,संवत्सर-(प्रतिनिधी)
आरोपींच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून रामवाडी संवत्सर येथील आरोपी करण सुदाम मोरे,संजय सुदाम मोरे,समाधान कचरु पोटे व वारी येथील आरोपी रोहीत दयानंद पवार आदींनी कट रचुन व संगनमत करून फिर्यादीचा भाऊ नवनाथ माधव कानकाटे यास हनुमान मंदीराजवळ बोलावुन घेतले व त्यास लोखंडी कत्ती,विटांनी व दगडांनी हाताला,डोक्याला मारुन त्याचा रात्री 09 वाजेच्या सुमारास खुन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर रामवाडी येथील मयत तरुण नवनाथ माधव कानकाटे (वय-32) याचे आरोपीच्या तालुक्यातील सासर असलेल्या बहिणीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे.त्यातून आरोपींनी मयतास फोन करून हनुमान मंदीराजवळ बोलावुन घेवुन,”तु आमच्या बहीणीच्या गावाला का जातो ? असा जाबसाल करून व त्याचा राग मनात धरुन आरोपी करण सुदाम मोरे,संजय सुदाम मोरे,समाधान कचरु पोटे व रोहीत दयानंद पवार आदींनी त्याचा काटा काढला आहे.
अनैतिक संबंधातून होणाऱ्या खुनाच्या घटना वाढण्यामागे सततचा संशय,त्रास बदनामीची भीती आणि भावनिक असंतुलन आदी मुख्य कारणे आहेत.वैयक्तिक नाते संबंधांमधील तणाव आणि संशयातून होणारे वाद विकोपाला जाऊन अशा निर्घृण हत्या घडतात.अशीच घटना काल रात्री 09 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायतीची वाडी असलेल्या रामवाडीत उघडकीस आली आहे.यातील मयत तरुण नवनाथ माधव कानकाटे (वय-32) याचे आरोपीच्या तालुक्यातील सासर असलेल्या बहिणीशी अनैतिक संबंध होते असा आरोप आहे.त्यातून आरोपींनी मयतास फोन करून हनुमान मंदीराजवळ बोलावुन घेवुन,”तु आमच्या बहीणीच्या गावाला का जातो ? असा जाबसाल करून व त्याचा राग मनात धरुन आरोपी करण सुदाम मोरे,संजय सुदाम मोरे,समाधान कचरु पोटे तिघे रा.रामवाडी ता.कोपरगाव,रोहीत दयानंद पवार वारी आदींनी कट रचुन,संगनमत करून फिर्यादी यांचा भाऊ नवनाथ कानकाटे यास हनुमान मंदीराजवळ बोलावुन घेतले व संजय सुदाम मोरे,समाधान कचरु पोटे व रोहीत दयानंद पवार यांनी लोखंडी कत्ती,विटांनी व दगडांनी हाताला,डोक्याला मारुन त्याचा खुन केला आहे.

दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना कळविल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नवनाथ कानकाटे यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती,पोलिस निरीक्षक कुंभार,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने,दिपक रोठे आदींनी भेट दिली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.या प्रकरणी मयताचा भाऊ समाधान माधव कानकाटे (वय-34) याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 101/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1),62(2),35(3),3(5) प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.



