जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

देवी मंदिरात चोरी,गुन्हा दाखल नाही !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस सुमारे वीस कि.मी.अंतरावर असलेल्या चास नळी येथील देवी मंदिरातील मूर्तीवरील पंचधातूची छत्री अज्ञात चोरट्यांने काढून चोरी केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याबाबत चलचित्रण उपलब्ध असताना मात्र सदरचे चित्रण स्पष्ट नसल्याने चोरट्यांना ओळखण्यात अडचणी येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान घटनेने ग्रामस्थानी आणि भाविकांनी संताप व्यक्त केला असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांना केले आहे.

चास नळी येथील देवी मंदिरातील देवीची छत्री काढताना चोरटा दिसत आहे.

कोपरगाव शहरात रहिवासी असलेल्या जीवन प्राधिकरण विभागाच्या सेवनिवृत अधिकाऱ्यांची बँक खात्यावरील जवळपास 87 लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी डिजिटल अटकेच्या भीती दाखवून लूट करण्याची घटना ताजी असताना व त्याबाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत आवाज उठवलेला असताना काल रात्री चोरट्यांनी देवी मंदिरात चोरी करून व आपली लीला दाखवून पुन्हा एकदा नेते आणि पोलिसांना आव्हान दिले आहे.

   कोपरगाव शहर आणि तालुक्यातील चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.कोपरगाव शहरातील एका ज्येष्ठ नागरिक व जीवन प्राधिकरण विभागाच्या सेवनिवृत अधिकाऱ्यांची बँक खात्यावरील जवळपास 87 लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी डिजिटल अटकेच्या भीती दाखवून लूट करण्याची घटना ताजी असताना व त्याबाबत कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी विधानसभेत आवाज उठवलेला असताना काल रात्री चोरट्यांनी आपली लीला दाखवून पुन्हा एकदा नेते आणि पोलिसांना आव्हान दिले आहे.यातील चोरट्यांनी काल मध्यरात्री पाळत ठेवून रात्री मंदिरात प्रवेश करून तेथील देवी मूर्तीच्या वर असलेली सुमारे 10 हजार रुपये किमतीची पंचधातूची छत्री काढून घेऊन पोबारा केला आहे.ही बाब नागरिकांना सकाळी लक्षात आली होती.याबाबत येथील पोलिस पाटील यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे.मात्र अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

चास नळी येथील देवी मंदिरातील देवीची छत्री काढून पळ काढताना चोरटा दिसत आहे.

  

कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील देवी मंदिरात चोरट्यांनी काल मध्यरात्री पाळत ठेवून रात्री प्रवेश करून तेथील देवी मूर्तीच्या वर असलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची पंचधातूची छत्री काढून घेऊन पोबारा केला आहे.ही बाब नागरिकांना सकाळी लक्षात आली आहे.पोलिसांनी या चोरट्यांना शोधून तातडीने अटक करावी”-ॲड.श्रीकांत चांदगुडे,चासनळी.

  दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्या घटनेला दुजोरा दिला आहे.व चलचित्रणाबाबत विचारणा केली असता चिलचिरणात असलेले व्यक्ती स्पष्ट दिसत नसल्याने ओळखू येत नसल्याचे सांगितले आहे.याबाबत आम्ही गांभीर्याने पुढील तपास करीत आहोत अशी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close