गुन्हे विषयक
माजी सरपंचाकडून ग्रामसेविकेचा विनयभंग !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत आपले कर्तव्य करणाऱ्या व नजीकच्या जिल्ह्यात रहिवासी असलेल्या ग्रामसेवक महिलेचा (वय-40) त्याच गावातील भोकरे नामक माजी सरपंच याने लगड करत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत ऐन व्हॅलेंटाईनच्या दिवशी विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी संबंधित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

विनयभंग करणारा आरोपी भोकरे हा माजी सरपंच असून त्याच गावातील रहिवासी आहे.तो वारंवार त्रास देण्याच्या आणि संधीच्या शोधात होता.काल व्हॅलेंटाइन या दिवसाची संधी शोधत त्याने दुपारी 5 वाजेच्या सुमारास महिला कर्मचारी या त्यांचे कार्यालयीन काम आटोपुन निघणार त्यावेळी आरोपीने त्यांना बसण्याचा आग्रह धरला व आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत विनयभंग केला असल्याचा आरोप बाधित महिला कर्मचाऱ्याने केला आहे.त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत.महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.याशिवाय महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.याशिवाय सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही स्थापन करण्यात आला आहे.याशिवाय महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.महिलांनी तक्रार केल्यास तातडीने पोलीस मदत मिळण्यासाठी १००,१०३,१०९१ क्रमांकांच्या हेल्पलाईन जारी करण्यात आल्या आहेत.राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांकांची मदत होत आहे.या हेल्पलाईनमुळे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना मदत मिळणे शक्य होत असल्याचा सरकारचा दावा आहे.महिलांवरील अत्याचाराच्या जलद न्यायासाठी,महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी न्यायदान प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असतानाही अशा गुन्ह्यात कमी येताना दिसत नाही.अशीच घटना काल व्हॅलेंटाईनच्या दिवशी दुपारी 04 वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत पूर्वेकडील गावात घडली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता सदर माजी सरपंच भोकरे याने आपला कालखंड संपल्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्याबद्दल वरिष्ठ कार्यालयात ऑनलाईन तक्रारी करून ग्रामसभा होत नाही,यासह पाण्याची टाकीचे काम होत नाही आदी तक्रारी केल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे.त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती असून प्रशासक यांनी यात मधला मार्ग काढला होता मात्र माजी सरपंच याने त्याला दाद दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्यातील विनयभंग करणारा आरोपी माजी सरपंच भोकरे हा पश्चिम गडाचा कार्यकर्ता त्याच गावातील रहिवासी असून तो वारंवार संधीच्या शोधात होता.काल व्हॅलेंटाइन या दिवसाची संधी शोधत त्याने दुपारी 5 वा चे सुमारास महिला कर्मचारी या त्यांचे कार्यालयीन काम आटोपुन निघणार त्यावेळी आरोपीने त्यांना बसण्याचा आग्रह धरला.त्यावेळी त्या आरोपीस म्हणाल्या की,” मला लांब जायचे आहे त्यामुळे निघावे लागेल” त्यावर आरोपी भोकरे मला म्हणाला,”तुम्ही खुप छान दिसता,”तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवक म्हणुन आलात तेव्हा पासुन तुम्ही मला आवडतात,मी तुमच्यावर खुप प्रेम करतो”असे म्हणून तुम्ही,” …. ?..?..? ..? आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून अनेक मुक्ताफळे उधळली असल्याचा आरोप करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 74 अन्वये गुन्हा क्रं 49/2026 प्रमाणे आरोपी माजी सरपंच याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री कारखिले हे करीत आहेत.



