गुन्हे विषयक
…या शहरात गोवंश हत्या सुरूच,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गोवंश हत्या बंद करावी यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रोश करत असल्या तरी त्यांना अद्याप तरी यश आलेले दिसत नाही त्यामुळे अद्यापही कोपरगावात वारंवार संजयनगर उपनगरात आयेशा कॉलनीत गोवंश हत्या होत असून अशीच एक घटना नुकतीच उघड झाली आहे.त्यात शहर पोलिसांनी 70 हजार रुपये किमतीची विविध सहा गोवंश जनावरे जप्त करून कारवाई केली असून आरोपी मज्जू कुरेशी नामक आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे आगामी शिवरात्रीच्या अगोदर ही घटना उघडकीस आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

“नूतन नगराध्यक्ष पराग संधान हे हिंदुत्ववादी विचारांचे व सनातन धर्म मानणारे असून त्यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शहरातील वातावरण बिघडू द्यायचे नसेल तर त्यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना हद्दपार करणे गरजेचे आहे.शिवाय एक नगरपरिषदेचे पथक तयार करून कारवाई केली पाहिजे”-शिवराज वहाडणे,भाजप युवा कार्यकर्ते,कोपरगाव.
महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील संजयनगर येथील एक गोवंश हत्येचा प्रकार 12 जानेवारी रोजी उघड झाला असताना नुकताच आगामी शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक गुन्हा एकदा उघड झाला आहे.विशेष म्हणजे कोपरगाव शहराच्या संजयनगर परिसरात हे गुन्हे वारंवार उघड होत आहे.विशेष म्हणजे तेच ते आरोपी पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करत असताना त्यांचेवर मोक्का गुन्हे का दखल होत नाही याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान काल दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोपरगाव संजयनगर आयेशा कॉलनी येथील आरोपी मुज्जु कुरेशी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”यांतील आरोपी याने महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरे कत्तला करण्यास प्रतिबंध असल्याचे माहिती असतांना १५ हजार रुपये किमतीची एक गोवंश जातीची काळी बांडी बिगर शिंगाची जर्शी गाय अंदाजे ०२ वर्षे वयाची,१५ हजार रुपये किमतीची एक गोवंश जातीची तांबडया रंगाची आखुड शिंगाची जर्शी गाय अंदाजे ०२ वर्षे वयाची,१५ हजार रुपये किमतीची एक गोवंश जातीची काळया रंगाची बिगर शिंगाची जर्शी गाय अंदाजे ०३ वर्षे वयाची,०५ हजार रूपये किमतीची एक गोवंश जातीची काळया पांढ-या रंगाची कालवड अंदाजे ०१ वर्षे वयाची,०५ हजार रुपये किमतीची एक गोवंश जातीची काळया रंगाची कालवड अंदाजे ०१ वर्षे वयाची असा एकूण ७० हजार रुपये किमतीचे गोवंश विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेले गोवंश जनावरे जप्त केले आहे.दरम्यान या घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे,पोलिस उपनिरीक्षक संजय पवार यांनी भेट दिली आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.38/2026,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारणा’ २०१५ चे कलम
कलम ५(ब),९,११ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्या बाबतचा अधिनियम १९६० चे कलम ३,११ प्रमाणे फिर्यादी पो.कॉन्स्टेबल श्रीकांत बाळु कु-हाडे,(वय-३६ वर्षे) यांनी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल ए.बी.राठोड हे करीत आहेत.
दरम्यान या गोवंश हत्येबाबत भाजपचे युवा कार्यकर्ते शिवराज विजय वहाडणे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,”नूतन नगराध्यक्ष हे हिंदुत्ववादी विचारांचे व सनातन धर्म मानणारे असून त्यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शहरातील वातावरण बिघडू द्यायचे नसेल तर त्यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना हद्दपार करणे गरजेचे आहे.शिवाय एक नगरपरिषदेचे पथक तयार करून कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.त्यामुळे नगराध्यक्ष आता काय कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार हे लवकरच उघड होणार आहे.



