गुन्हे विषयक
…या शहरात गोवंश हत्या थांबेना,दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील कोपरगाव संजयनगर येथील आयेशा कॉलनी येथे गोवंश कत्तल थांबण्याचे नाव घेत नाही.गत नोव्हेंबर मध्ये काटवणात 13 जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा सुमारे 45 हजार रुपयांचे 300 किलो गोवंश मांस आढळून आल्याने या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रसाद राजेंद्र साळुंखे यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी आसिफ रफिक कुरेशी व शाहरुख लतिफ कुरेशी या दोघांचे विरूध्द गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात नोव्हेंबर मधील गोवंश हत्येची घटना ताजी असताना आज पुन्हा एक गोवंश हत्येचा प्रकार उघड झाला आहे.विशेष म्हणजे कोपरगाव शहराच्या संजयनगर परिसरात हे गुन्हे वारंवार उघड होत आहे.विशेष म्हणजे तेच ते आरोपी पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करत असताना त्यांचेवर मोक्का गुन्हे का दखल होत नाही याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील संजयनगर येथील आयेशा कॉलनी येथे काटवणात लहान मोठी 13 जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने वरील वर्णनाचा गोवंश जातीचे जनावरे हे निर्दयतेने वागणुक देवुन आखुड दोरीने बांधुन ठेवलेले मिळुन आले होते.याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली होती.ही घटना ताजी असताना आज पुन्हा एक गोवंश हत्येचा प्रकार उघड झाला आहे.विशेष म्हणजे कोपरगाव शहराच्या संजयनगर परिसरात हे गुन्हे वारंवार उघड होत आहे.विशेष म्हणजे तेच ते आरोपी पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करत असताना त्यांचेवर मोक्का गुन्हे का दखल होत नाही याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
आज सकाळी 11.15 वाजता पोलिसांना मिळालेल्या गुप्त खरी वरून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती हाती आली आहे.पोलिसांनी केलेल्या कारवाईत 45 हजार रुपये किमतीचे 300 किलो गोवंश जातीचे मांस आढळून आले आहे.त्याची 150 किलो रुपये दराने 45 हजार रुपये किंमत होत आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.1३8/२०२6 भारतीय न्याय संहिता कलम 325 सह महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधिनीयम १९७६ चे सुधारीत अधिनीयम २०१५चे कलम 32५ कलम 5(क)9(अ)११ प्रमाणे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बबन तमनर हे करीत आहेत.



