जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दोघांवर ॲस्ट्रॉसिटी!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी) 

   कोपरगाव तालुक्यातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या गावात फिर्यादी महिला व तिची मुलगी अशा दोघी आपल्या शेतात काल सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शेतीचे काम करण्यास गेली असता आरोपी साईनाथ सोनवणे व संकेत सोनवणे आदी दोघांनी त्यांना दोघी अनुसूचित जमातीच्या असल्याचे माहिती असूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून दुसरा आरोपी याने हाताने अश्लील हावभाव केल्यावरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.

  

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार तीन वर्षापूर्वी कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या खरेदीवरून दोन कुटुंबात वाद निर्माण झाला होता.त्यातील मयत इसमाचे कुटुंब ती जमीन वाट्याने करत असल्यानं त्याला ती खरेदी करायची असल्याने दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला होता.तो अखेर टोकाला गेला होता.त्यातून विरोधी गटाने त्यावेळी चिडून जाऊन जमीन खरेदीस विरोध करणारे इसमावर हल्ला केला होता.दरम्यान तो उपचार सुरू असताना नाशिक येथे मृत्युमुखी पडला होता.त्यामुळे हा सुडाचा प्रवास संपणार केव्हा अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू झाली आहे.

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,”ॲट्रॉसिटी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालणारा भारतीय कायदा-1989) होय, जो त्यांच्या सन्मानावर,सुरक्षिततेवर आणि हक्कांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण देतो,ज्यात जातीय भेदभावावर आधारित क्रूर,हिंसक आणि अपमानकारक कृत्यांचा समावेश असतो आणि या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.हा कायदा समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.त्यातून अनुसूचित जाती-जमातींच्या सदस्यांविरुद्ध होणारे अत्याचार रोखणेसह जातीय भेदभावामुळे केलेली हत्या,मारहाण,लैंगिक अत्याचार,मालमत्तेचे नुकसान,अपमानास्पद वागणूक,किंवा सामाजिक बहिष्कार यांसारख्या कृत्यांना ‘अत्याचार’ मानले जाते.त्यासाठी जलद न्यायालये स्थापून बाधितांना तातडीने न्याय देण्याची कायदात तरतूद आहे.तरीही अशा घटनांना आळा बसण्याऐवजी ते वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.तर बऱ्याच वेळा त्याचा शस्त्र म्हणून दुरुपयोग होताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यात याचा अनेकवेळा अनुभव येताना दिसत आहे.

    दरम्यान अशीच घटना काल कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.यातील फिर्यादी महिला आणि तिची मुलगी या दोघी
आपल्या शेतात सामायिक बांधाजवळ काम करण्यास गेल्या असता तिथे दोन्ही आरोपी नांगरत करत होते.त्यांना त्यांचा राग येऊन त्यांना त्या अनुसूचित जातीच्या असल्याचे माहिती असूनही त्यांना शिवीगाळ करून पहिला आरोपी साईनाथ सोनवणे याने त्यांना शिवीगाळ केली तर दुसरा आरोपी संकेत सोनवणे याने त्यांना अश्लील हावभाव केल्या असल्याचा आरोप केला आहे.यावरून त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

   कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.09/2026 भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 75,352,सह बालकांचे लैंगिक अप्रधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 1889 सुधारणा 1015 चे कलम 3(1)(डब्ल्यू.)(2)3(1)(आर)(एस)प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार तीन वर्षापूर्वी कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमिनीच्या खरेदीवरून दोन कुटुंबात वाद निर्माण झाला होता.त्यातील मयत इसमाचे कुटुंब ती जमीन वाट्याने करत असल्यानं त्याला ती खरेदी करायची असल्याने दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला होता.तो अखेर टोकाला गेला होता.त्यातून विरोधी गटाने त्यावेळी चिडून जाऊन जमीन खरेदीस विरोध करणारे इसमावर हल्ला केला होता.दरम्यान तो उपचार सुरू असताना नाशिक येथे मृत्युमुखी पडला होता.सदर खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.आणि पुन्हा एकदा एक प्रकरण चिघळले असल्याचे मानले जात आहे.हा सुडाचा प्रवास थांबणार केव्हा ? अशी चर्चा घटनास्थळी आणि कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close